Ersan Saner : 'या' देशाच्या पंतप्रधानांचा सेक्स अ‍ॅक्ट व्हिडिओ लीक, द्यावा लागला राजीनामा, माफियाने लीक केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 12:04 PM2021-10-22T12:04:43+5:302021-10-22T12:08:19+5:30

Ersan Saner : इरसान सानेर यांचा सेक्स अ‍ॅक्ट व्हिडिओ एका माफियाने लीक केल्याचा आरोप आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये आपण नसून हे बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, असा दावा इरसान सानेर यांनी केला आहे.

Northern Cyprus PM Ersan Saner resigns after video of ‘him performing solo sex act’ to woman is ‘leaked by the mafia’ | Ersan Saner : 'या' देशाच्या पंतप्रधानांचा सेक्स अ‍ॅक्ट व्हिडिओ लीक, द्यावा लागला राजीनामा, माफियाने लीक केल्याचा आरोप

Ersan Saner : 'या' देशाच्या पंतप्रधानांचा सेक्स अ‍ॅक्ट व्हिडिओ लीक, द्यावा लागला राजीनामा, माफियाने लीक केल्याचा आरोप

Next

उत्तर सायप्रसचे (Northern Cyprus) पंतप्रधान इरसान सानेर (Ersan Saner) यांनी एक व्हिडिओ लीक झाल्यानंतर राजीनामा दिला आहे. इरसान सानेर यांचा सेक्स अ‍ॅक्ट व्हिडिओ एका माफियाने लीक केल्याचा आरोप आहे. मात्र, या व्हिडिओमध्ये आपण नसून हे बदनाम करण्याचे षडयंत्र आहे, असा दावा इरसान सानेर यांनी केला आहे. (Northern Cyprus PM Ersan Saner resigns after video of ‘him performing solo sex act’ to woman is ‘leaked by the mafia’)

दोन मुलांचे वडील असलेले 54 वर्षीय इरसान सानेर हे गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय दबावाखाली होते. त्यांची स्वतःची पार्टी राष्ट्रीय एकता पार्टीने (UBP) सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. मात्र, इरसान सानेर हे सरकारमध्ये होते. तसेच, निवडणुकीनंतर इरसान सानेर यांनी राजकारण सुरू ठेवण्याची योजना आखली होती. पण मंगळवारपर्यंत आपत्तीजनक व्हिडिओ समोर आल्यानंतर, इरसान सानेर यांच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. 

या व्हिडिओमध्ये 20 वर्षीय मुलगी स्ट्रिप टीज करताना दिसत आहे, तर पंतप्रधान इरसान सानेर कथितरित्या मास्टरबेट करताना दिसत आहेत. मात्र, इरसान सानेर यांनी हा व्हिडिओ बनावट असल्याचा दावा केला आहे. मीडियाशी बोलताना इरसान सानेर म्हणाले की, "हा व्हिडिओ माझा नाही आहे. कोणीतरी मला माझ्या प्रिय देशाची, माझ्या पार्टीची सेवा करण्यापासून रोखू इच्छित आहे, परंतु ते राजकीय मार्गाने नव्हे तर खुल्या हल्ल्यांद्वारे करत आहेत. या उद्देशासाठी पूर्णपणे तयार केलेले हे एक षडयंत्र आहे."

याचबरोबर, तुर्की माफियांवर आरोप करत, इरसान सानेर म्हणाले की, 'हा केवळ माझ्यावर नाही तर माझ्या कुटुंबावर, माझ्या पार्टीवर आणि आमच्या राजकीय संस्थांवर हल्ला केला आहे. त्यामुळे आम्ही आमच्या कायदेशीर सल्लागारांबरोबर चर्चा करत आहोत.' दरम्यान, हा व्हिडिओ लीक झाल्यानंतर येथील राजकीय वातावरण तापले आहे.

Web Title: Northern Cyprus PM Ersan Saner resigns after video of ‘him performing solo sex act’ to woman is ‘leaked by the mafia’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app