उत्तर कोरियाकडून सुमारे १० क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 08:06 IST2026-03-15T08:04:37+5:302026-03-15T08:06:34+5:30

   ही क्षेपणास्त्रे उ. कोरियाची राजधानी प्योंगयांगजवळील परिसरातून डागण्यात आली असून ती जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील समुद्रात कोसळल्याचे जपानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. या घटनेनंतर दक्षिण कोरियाने या प्रदेशात 

North Korea launches about 10 missiles | उत्तर कोरियाकडून सुमारे १० क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण

उत्तर कोरियाकडून सुमारे १० क्षेपणास्त्रांचे प्रक्षेपण

सोल : अमेरिका व दक्षिण कोरिया यांच्या संयुक्त लष्करी सरावाला प्रतिक्रिया देत शनिवारी उत्तर कोरियाने पूर्व समुद्राकडे १० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. दक्षिण कोरियाच्या लष्कराने ही माहिती देत हे प्रक्षेपण शक्तिप्रदर्शनाचा भाग असल्याचे म्हटले आहे. 

   ही क्षेपणास्त्रे उ. कोरियाची राजधानी प्योंगयांगजवळील परिसरातून डागण्यात आली असून ती जपानच्या विशेष आर्थिक क्षेत्राबाहेरील समुद्रात कोसळल्याचे जपानच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले. या घटनेनंतर दक्षिण कोरियाने या प्रदेशात 

बंदोबस्त वाढवला असून अमेरिका व जपानसोबत माहितीची देवाणघेवाण 
सुरू ठेवली आहे. यावर उत्तर कोरियाच्या सुरक्षिततेला कोणतेही आव्हान दिल्यास भीषण परिणाम होतील, असा इशारा उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग 
यांनी दिला.

लष्करी सराव व तणाव
अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यात दरवर्षी होणारा फ्रीडम ‘शिल्ड’ हा ११ दिवसांचा संयुक्त लष्करी सराव सध्या सुरू आहे आणि तो १९ मार्चपर्यंत चालणार आहे. ‘वॉरियर शिल्ड’ नावाचा प्रत्यक्ष मैदानी प्रशिक्षण कार्यक्रमही राबवला जात आहे. 

उत्तर कोरिया अनेक वर्षांपासून या सरावास संभाव्य आक्रमणाची तयारी असल्याचा आरोप करत आला आहे आणि अशा सरावांच्या काळात तो अनेकदा क्षेपणास्त्र चाचण्या किंवा लष्करी प्रात्यक्षिके करत असतो. द. कोरियाने अमेरिकेच्या लष्करी कारवायांबाबत तपशील सांगणे टाळले. 
 

Web Title : उत्तर कोरिया ने बढ़ते तनाव के बीच लगभग 10 मिसाइलें दागीं

Web Summary : अमेरिका-दक्षिण कोरिया के सैन्य अभ्यास के जवाब में उत्तर कोरिया ने पूर्वी सागर की ओर दस बैलिस्टिक मिसाइलें दागीं। प्योंगयांग के पास से प्रक्षेपण जापान के आर्थिक क्षेत्र के बाहर गिरे। दक्षिण कोरिया ने अमेरिका और जापान के साथ डेटा साझा करते हुए सुरक्षा बढ़ाई। किम यो जोंग ने उत्तर कोरिया की सुरक्षा को खतरे में डालने पर गंभीर परिणाम की चेतावनी दी।

Web Title : North Korea Launches Approximately 10 Missiles Amidst Rising Tensions

Web Summary : North Korea fired ten ballistic missiles towards the East Sea in response to US-South Korea military drills. The launches, from near Pyongyang, landed outside Japan's economic zone. South Korea heightened security, sharing data with the US and Japan. Kim Yo Jong warned of severe consequences if North Korea's security is threatened.