किम जोंग उनच्या लेकीने गाजवला लष्करी सराव! उत्तर कोरियाच्या लष्करी सरावात चालवला रणगाडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 08:36 IST2026-03-21T08:36:30+5:302026-03-21T08:36:52+5:30

वडिलांच्या देखरेखीखाली तिने केलेल्या या धाडसी कृत्यामुळे तीच किम जोंग उनची उत्तराधिकारी असणार, या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. अमेरिका व दक्षिण कोरिया यांच्यात सुरू असलेल्या लष्करी सरावाच्या पार्श्वभूमीवर उ. कोरियाने शक्तिप्रदर्शन केले आहे. किम जु अे अनेकदा लष्करी कार्यक्रमांत दिसत आहे.

North Korea Kim Jong Un's daughter military drills drives tank in military drills | किम जोंग उनच्या लेकीने गाजवला लष्करी सराव! उत्तर कोरियाच्या लष्करी सरावात चालवला रणगाडा

किम जोंग उनच्या लेकीने गाजवला लष्करी सराव! उत्तर कोरियाच्या लष्करी सरावात चालवला रणगाडा

सोल : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची किशोरवयीन कन्या किम जु अे सध्या जागतिक चर्चेचा विषय ठरली आहे. लष्करी प्रशिक्षणादरम्यान तिने चक्क रणगाडा चालवल्याचे समोर आले असून, याचे फोटो आणि व्हिडीओ सरकारी माध्यमांनी प्रसिद्ध केले आहेत. 

वडिलांच्या देखरेखीखाली तिने केलेल्या या धाडसी कृत्यामुळे तीच किम जोंग उनची उत्तराधिकारी असणार, या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे. अमेरिका व दक्षिण कोरिया यांच्यात सुरू असलेल्या लष्करी सरावाच्या पार्श्वभूमीवर उ. कोरियाने शक्तिप्रदर्शन केले आहे. किम जु अे अनेकदा लष्करी कार्यक्रमांत दिसत आहे.

लष्करी सरावात सहभाग -
गुरुवारी पार पडलेल्या या युद्ध सरावामध्ये रणगाडा युनिट्स आणि पायदळ तुकड्यांचा समावेश होता. यावेळी किम जोंग उन यांनी युद्धाच्या तयारीला वेग देण्याचे आवाहन केले. प्रसिद्ध झालेल्या फोटोंमध्ये १३ वर्षीय किम जु अे एका ऑलिव्ह ग्रीन रंगाच्या रणगाड्याच्या ड्रायव्हर हॅचमधून डोकावताना दिसत आहे, तर तिचे वडील किम जोंग उन बाजूला बसून हसताना दिसत आहेत.

Web Title : किम जोंग उन की बेटी ने टैंक चलाया, उत्तराधिकार की अटकलें तेज़

Web Summary : किम जोंग उन की बेटी, किम जू ए, ने सैन्य अभ्यास के दौरान टैंक चलाया, जिससे उनके उत्तराधिकार की अटकलें तेज हो गईं। अमेरिका-दक्षिण कोरिया अभ्यास के बीच, इस अभ्यास ने उत्तर कोरिया की सैन्य शक्ति का प्रदर्शन किया। किम जोंग उन ने युद्ध की तैयारी में तेजी लाने का आग्रह किया।

Web Title : Kim Jong Un's Daughter Drives Tank, Sparks Succession Talk

Web Summary : Kim Jong Un's daughter, Kim Ju Ae, drove a tank during a military drill, fueling speculation about her succession. The exercise, amidst US-South Korea drills, showcased North Korea's military might. Kim Jong Un urged faster war preparations.