किम जोंग उनचा 'धडाका'! निवडणुकीत १००% यश, पण विरोधात किती मतदान? पाहा उत्तर कोरियातील अजब लोकशाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 13:46 IST2026-03-18T13:11:17+5:302026-03-18T13:46:07+5:30

उत्तर कोरियामध्ये नुकत्याच निवडणुका पार पडल्या, या निवडणुकीत किम जोंग उन यांच्या पक्षाला मोठे यश मिळाले आहे.

north korea election Kim Jong Un's explosion 100% success in the election, but how many votes were against? See the strange democracy in North Korea | किम जोंग उनचा 'धडाका'! निवडणुकीत १००% यश, पण विरोधात किती मतदान? पाहा उत्तर कोरियातील अजब लोकशाही

किम जोंग उनचा 'धडाका'! निवडणुकीत १००% यश, पण विरोधात किती मतदान? पाहा उत्तर कोरियातील अजब लोकशाही

उत्तर कोरियामध्ये निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीमध्ये किम जोंग उन यांच्या वर्कर्स पार्टी ऑफ कोरिया आणि त्यांच्या मित्रपक्षांनी उत्तर कोरियातील २०२६ च्या संसदीय निवडणुका पुन्हा एकदा जिंकल्या आहेत. उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनुसार, १५ मार्च रोजी झालेल्या मतदानात एकूण ९९.९९ टक्के मतदारांनी भाग घेतला. ९९.९३ टक्के मतदारांनी नामांकित उमेदवारांना पाठिंबा दिला. केवळ ०.०७ टक्के मतदारांनी विरोधात मतदान केले.

US Israel Iran War : इराण हादरलं! बुशेहर अणुप्रकल्पाच्या अगदी जवळ पडलं क्षेपणास्त्र; इराण आता देणार सर्वात मोठं प्रत्युत्तर?

यामुळे सत्ताधारी आघाडीने सर्व ६८७ जागा जिंकल्या. १५ व्या सर्वोच्च जनसभेचे प्रतिनिधी निवडण्यासाठी या निवडणुका घेण्यात आल्या होत्या.मतदानाच्या निकालानंतर, नवीन सभेची पहिली बैठक लवकरच प्योंगयांग येथे होणार आहे. यामध्ये नवीन राज्य नेतृत्वाची निवड केली जाणार आहे. समाजवादी संविधानात मोठ्या दुरुस्त्या केल्या जाणार आहेत.

निवडणुकीनंतर असेंब्ली बैठक घेणार

नव्या सर्वोच्च जनसभेच्या या पहिल्या बैठकीत किम जोंग उन यांची राज्य व्यवहार आयोगाचे अध्यक्ष म्हणून पुन्हा निवड होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, संविधानातील दुरुस्त्यांवरही चर्चा केली जाणार आहे.

कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीनुसार, या बैठकीत लोकशाही प्रजासत्ताक कोरियाच्या राज्य व्यवहार अध्यक्षांच्या निवडणुकीवर आणि संविधानातील आवश्यक दुरुस्त्यांवर निर्णय घेतला जाणार आहे.

ही बैठक गेल्या महिन्यात झालेल्या वर्कर्स पार्टीच्या नवव्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर होत आहे. तज्ज्ञांच्या मते, उत्तर कोरियाचे दक्षिण कोरियाप्रती असलेले शत्रुत्वपूर्ण धोरण अधिकृतपणे संविधानात समावेश केले जाऊ शकते. म्हणजेच, आता दोन्ही कोरियांना शत्रू म्हणून घोषित केले जाऊ शकते.

या निवडणुकीत खासदारांच्या यादीत मोठा फेरबदल झाला आहे. ७० टक्क्यांहून अधिक चेहरे नवीन आहेत. मागील कार्यकाळाच्या तुलनेत हा एक महत्त्वपूर्ण बदल आहे. तज्ज्ञांच्या मते, आपली सत्ता आणखी मजबूत करण्याचा हा किम जोंग उन यांचा हेतू आहे.

नवीन यादीत किम यांचे निकटचे सहकारी, जो योंग-वॉन यांचा समावेश आहे, त्यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. दरम्यान, माजी अध्यक्ष चोए रयोंग-हे यांना नुकत्याच झालेल्या पक्ष अधिवेशनात त्यांच्या पदावरून हटवण्यात आले. 

उत्तर कोरियामध्ये निवडणुका नेहमीच केवळ एक औपचारिकता मानल्या जातात. मतदान गुप्त नसते आणि बहुतेक लोक नामांकित उमेदवारालाच मत देतात. यावेळी ०.०७ टक्के विरोधी मते झाले आहे. लोकांना निषेध करण्याचा अधिकार आहे हे जगाला दाखवण्यासाठी हे एक प्रचाराचे डावपेच म्हणून पाहिले जात आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पक्षाच्या निर्णयांना कायदेशीर मान्यता देण्यासाठी आहे. 

Web Title : उत्तर कोरिया में किम जोंग उन की प्रचंड जीत; विरोध नगण्य।

Web Summary : उत्तर कोरिया के चुनावों में किम जोंग उन की पार्टी ने लगभग पूर्ण मतदाता भागीदारी के साथ सभी सीटें हासिल कीं। विरोध में बहुत कम वोट पड़े, जिसे एक प्रतीकात्मक इशारा माना जा रहा है। नई असेंबली नेताओं की नियुक्ति के लिए बुलाई जाएगी और संभावित रूप से संविधान में दक्षिण कोरिया विरोधी नीतियों को मजबूत किया जाएगा।

Web Title : Kim Jong Un's landslide victory in North Korea; minimal opposition.

Web Summary : North Korea's elections saw Kim Jong Un's party secure all seats with near-total voter participation. A tiny fraction voted against, seen as a symbolic gesture. The new assembly will convene to appoint leaders and potentially solidify anti-South Korea policies in the constitution.