शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

चिंता वाढली! कोरोनापाठोपाठ आता Norovirus चा प्रादुर्भाव, इंग्लंडमध्ये 154 जणांना लागण; जाणून घ्या, नोरोव्हायरस काय आहे? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2021 14:36 IST

Norovirus outbreak in UK : नोरोव्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथील  पब्लिक हेल्थ इंग्लंड (पीएचई)ने देशात अलर्ट जारी केला आहे.

ठळक मुद्देइंग्लंडमध्ये नोरोव्हायरसची लागण झालेल्या 154 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. पीएचईने शैक्षणिक सेटिंग्समध्ये नोरोव्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची सूचना विशेषतः नर्सरी आणि चाइल्ड केअर सुविधांमध्ये दिली आहे.

Norovirus outbreak in UK : जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसची (Coronavirus 3rd Wave) तिसरी लाट आल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट (Delta Plus Varient) वेगाने पसरत आहे. अशातच इंग्लंडमध्ये कोरोना व्हायरसच्या निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र, येथे आता नोरोव्हायरसच्या प्रादुर्भावाचा इशारा देण्यात आला आहे. नोरोव्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. येथील  पब्लिक हेल्थ इंग्लंड (पीएचई)ने देशात अलर्ट जारी केला आहे. (norovirus spread uk after corona you also need know about infection)

पीएचईने दिलेल्या माहितीनुसार, मे महिन्याच्या शेवटापासून पुढच्या पाच आठवड्यांमध्ये इंग्लंडमध्ये नोरोव्हायरसची लागण झालेल्या 154 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 5 वर्षांमध्ये समान काळात नोरोव्हायरसची लागण झालेल्या रुग्णांमध्ये तीन पटींनी वाढ झाली आहे. अत्यंत चिंताजनक गोष्ट म्हणजे, पीएचईने शैक्षणिक सेटिंग्समध्ये नोरोव्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याची सूचना विशेषतः नर्सरी आणि चाइल्ड केअर सुविधांमध्ये दिली आहे. 

नोरोव्हायरस काय आहे? रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रे (सीडीसी) नुसार, नोरोव्हायरस एक संसर्गजन्य व्हायरस आहे. ज्यामुळे उलट्या आणि मळमळ यासारखी लक्षणे दिसून येतात. पीएचई याला 'Winter Vometing Bug' असे म्हटले आहे. तसेच, सीडीसीच्या म्हणण्यानुसार नोरोव्हायरस आजाराचे लोक कोट्यवधी व्हायरसचे कण टाकू शकतात आणि त्यातील काही लोकच इतर लोकांना आजारी बनवू शकतात.

नोरोव्हायरसची लक्षणे... सीडीसीने नोरोव्हायरसची काही मुख्य लक्षण जारी करण्यात आली आहेत. जुलाब, उलट्या, मळमळ होणं आणि पोटाच्या समस्या उद्भवतात. यामुळे पोटाला किंवा आतड्यांना सूजही येते. इतर लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी आणि शरीरामध्ये वेदना होणं यांसारख्या समस्याही उद्भवतात. रुग्णांमध्ये नोरोव्हायरसची लक्षणे दिसण्यास 12 ते 48 तासांचा अवधी लागतो. 

नोरोव्हायरसवर उपचार : या व्हायरसवर सध्या कोणतेही प्रभावी औषध उपलब्ध नाही. विशेषतः या आजारामध्ये दिसून येणाऱ्या लक्षणांसाठी वापरली जाणारी औषधं पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे नोरोव्हायरसनं इंग्लंडसोबतच जगभरातील इतर देशांची चिंताही वाढवली आहे. 

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे थैमान; सहा महिन्यांचा उच्चांक गाठलाब्रिटनमध्ये (Britain) कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने (Third Wave of corona) रौद्ररुप धारण करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या शुक्रवारी तिथे 51,870 नवे रुग्ण सापडले आहेत. यामुळे सहा महिन्यांपूर्वीची रुग्णसंख्या गाठली आहे. जानेवारीनंतर पहिल्यांदा 50 हजारहून अधिक कोरोना बाधित सापडले आहेत. महत्वाचे म्हणजे ब्रिटनचे आरोग्य मंत्री कोरोना बाधित झाले आहेत.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसEnglandइंग्लंडHealthआरोग्य