Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 17:55 IST2025-10-09T17:54:02+5:302025-10-09T17:55:34+5:30
Nobel Prize 2025: 1985 मध्ये प्रकाशित झालेल्या ‘Satantango’ कादंबरीने लास्झलो क्रास्नाहोरकाई यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवून दिली.

Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
Nobel Prize 2025: 2025 चा साहित्यातीलनोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. हंगेरियन लेखक लास्झ्लो क्रॅस्नाहोरकाई (László Krasznahorkai) यांना त्यांच्या “दूरदर्शी आणि कलात्मक दृष्टिकोनातून लिहिलेल्या कृत्यांसाठी” हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेसने हा पुरस्कार जाहीर करताना म्हटले की, क्राझ्नाहोर्काई यांच्या लेखनात सर्वनाशकारी भय आणि गोंधळाच्या काळातही कलेची शक्ती आणि मानवी आत्म्याचा धीर टिकवण्याचा संदेश दिसतो. त्यांच्या रचनांवर चीन आणि जपानच्या प्रवासांचा खोल परिणाम झाल्याचेही अकॅडमीने नमूद केले आहे.
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
लास्झलो यांची 2003 मधील प्रसिद्ध कादंबरी ‘Északról hegy, Délről tó, Nyugatról utak, Keletről folyó’ (उत्तर पर्वत, दक्षिण सरोवर, पश्चिम रस्ते, पूर्व नदी) ही क्योटोच्या आग्नेय भागात घडणारी, काव्यात्मक आणि रहस्यमय कथा आहे. ही कादंबरी त्यांच्या पुढील महत्त्वाच्या कादंबऱ्या ‘Seiobo járt odalent’ (2008; Seiobo There Below, 2013) साठी एक प्रस्तावना मानली जाते. ही रचना 17 कथांचा संग्रह असून, फिबोनाची क्रमात मांडलेली सौंदर्य, अनित्यता आणि सर्जनशीलतेवरील चिंतन यांवर आधारित आहे.
BREAKING NEWS
— The Nobel Prize (@NobelPrize) October 9, 2025
The 2025 #NobelPrize in Literature is awarded to the Hungarian author László Krasznahorkai “for his compelling and visionary oeuvre that, in the midst of apocalyptic terror, reaffirms the power of art.” pic.twitter.com/vVaW1zkWPS
क्राझ्नाहोर्काई यांचा जीवनप्रवास
लास्झलो क्राझ्नाहोर्काई यांचा जन्म 1954 मध्ये हंगेरीतील ग्युला (Gyula) या छोट्या शहरात, रोमानिया सीमेच्या जवळ झाला. त्यांची पहिली कादंबरी ‘Satantango’ 1985 मध्ये प्रकाशित झाली, जी त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्धी मिळवून देणारी ठरली. ही कथा साम्यवादाच्या पतनाच्या काळातील हंगेरीतील ग्रामीण जीवनातील निराशा, रिक्तता आणि आशेच्या प्रतीक्षेचे प्रभावी चित्रण करते.
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
या कादंबरीवर आधारित 1994 मध्ये बेल्ला टार (Béla Tarr) यांनी अत्यंत प्रशंसनीय चित्रपट तयार केला होता. त्यांची लेखनशैली दीर्घ, वादळासारखी आणि सम्मोहक मानली जाते. त्यांच्या साहित्यामध्ये जग तुटत असले तरी, त्या तुटणाऱ्या जगात ते सौंदर्य, कलात्मकता आणि जिजीविषेचा अर्थ शोधतात. त्यांच्या प्रमुख साहित्यकृतींमध्ये Satantango, The Melancholy of Resistance आणि Baron Wenckheim’s Homecoming आहेत.