शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

उत्तर कोरिया व अमेरिकेमध्ये युद्ध झाल्यास कोणीही जिंकणार नाही- चीन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 4:57 PM

गेल्या काही दिवसांपासून कोरियन द्विपकल्पात युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील धमक्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यातच आता चीननंही अमेरिका आणि उत्तर कोरियाच्या वादात उडी घेतली आहे.

ठळक मुद्दे चीननंही अमेरिका आणि उत्तर कोरियाच्या वादात उडी घेतली आहे. जर कोरियन द्विपकल्पात युद्ध झालं, तर कोणीही जिंकणार नाही, असं विधान चीननं केलं आहे. अमेरिकेनं कोणत्याही पद्धतीच्या युद्धाची घोषणा केली नाही, उत्तर कोरियाचे आरोप बिनबुडाचे आणि निराधार असल्याचंही प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

बीजिंग - गेल्या काही दिवसांपासून कोरियन द्विपकल्पात युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील धमक्या थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. त्यातच आता चीननंही अमेरिका आणि उत्तर कोरियाच्या वादात उडी घेतली आहे. जर कोरियन द्विपकल्पात युद्ध झालं, तर कोणीही जिंकणार नाही, असं विधान चीननं केलं आहे.विशेष म्हणजे उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री यांच्या इशा-यानंतर चीननं विधान केलं आहे. त्यामुळे चीनच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झालं आहे. उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री म्हणाले होते, ट्रम्प यांच्या विधानवरून त्यांनी युद्धाची घोषणा केली असून, उत्तर कोरिया या युद्धाला सामोरं जाण्यासाठी तयार आहे. त्यानंतर चीननंही या वादात युद्ध झाल्यास कोणीही जिंकणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. अमेरिका व उत्तर कोरियाचे राजकर्त्यांना कदाचित हे माहिती असेल की, सैन्याच्या माध्यमातून युद्ध करणं ही व्यवहार्य पद्धत नाही, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त लू कांग म्हणाले आहेत.उत्तर कोरियाच्या विदेश मंत्र्यांच्या विधानानंतर व्हाइट हाऊसचे प्रेस सचिव साराह सेंडर्स यांनीही नवं प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. या पत्रकात अमेरिकेनं कोणत्याही पद्धतीच्या युद्धाची घोषणा केली नाही, उत्तर कोरियाचे आरोप बिनबुडाचे आणि निराधार असल्याचंही या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. हुकूमशहा किम जोंग-उनच्या कारवायांमुळे उत्तर कोरिया आणि अमेरिकेमध्ये निर्माण झालेला तणाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग-उनचा रॉकेट मॅन असा उल्लेख केल्यानंतर खवळलेल्या उत्तर कोरियाने डोनाल्ड ट्रम्प हे आत्महत्या करण्याच्या मोहिमेवर निघाले आहेत, अशी प्रतिक्रिया दिली होती.संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करताना उत्तर कोरियाचे परराष्ट्रमंत्री रि योंग हो म्हणाले, डोनाल्ड ट्रम्प यांनी किम जोंग उन यांचा उल्लेख रॉकेटमॅन असा केला होता. त्यामुळे अमेरिकेच्या मुख्य भूमीच्या दिशेने रॉकेट सोडणे अनिवार्य झाले होते. दीर्घ आणि कठीण संघर्षानंतर आम्ही अणुऊर्जा निर्मिती करण्याच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. त्यामुळे विरोधकांनी आमच्यावर निर्बंध घातल्याने आमच्या भूमिकेत बदल होईल असे मानणे चुकीचे ठरेल." गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकी वायूसेनेची बी-1बी ही बॉम्बवाहू विमाने उत्तर कोरियाच्या पूर्व किनाऱ्यावरून घिरट्या घालून गेली होती. तसेच संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करताना ट्रम्प यांनी उत्तर कोरियावर अधिकचे निर्बंध घातले होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला ‘पूर्णपणे नष्ट’ करण्याचा आणि शस्त्रास्त्रे कार्यक्रमावरून इराणच्या प्राणघातक राजवटीशी संघर्ष करण्याचा अत्यंत कठोर इशारा दिला होता. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ट्रम्प यांनी आपल्या पहिल्या कडक भाषा वापरलेल्या भाषणात उत्तर कोरियाला अणू क्षेपणास्त्रांचा कार्यक्रम सुरू न ठेवण्याचा इशारा दिला. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-ऊन यांचा उल्लेख ‘रॉकेट मॅन’ असा करून त्याचा देश नष्ट करण्याची धमकी दिली. ‘अमेरिकेकडे प्रचंड शक्ती आणि संयम आहे; परंतु आम्हाला स्वत:चे व किंवा आमच्या मित्रदेशांचे संरक्षण करणे भाग पडले तर उत्तर कोरियाला पूर्णपणे नष्ट करण्याशिवाय आमच्याकडे दुसरा मार्ग नसेल,’ असे ट्रम्प म्हणाले. रॉकेट मॅन हा स्वत:च्या आणि त्याच्या राजवटीच्या आत्मघाती मोहिमेवर आहे, असे सांगून ट्रम्प म्हणाले की, ‘अमेरिका तयार आहे, तिची तयारी आणि ती सक्षम आहे; परंतु आशा आहे की, या सगळ्याची गरज भासणार नाही.’ यानंतर उत्तर कोरियाचे परराष्ट्र मंत्री रि यांग हो यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीची तुलना कुत्र्याच्या भुंकण्याशी केली होती. यांग हो यांनी न्यू यॉर्क येथे युनायटेड नेशनच्या मुख्यालयाजवळ मीडियाला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीची तुलना कुत्र्याच्या भुंकण्याशी केली होती. या महिन्याच्या सुरुवातीला उत्तर कोरियाने सर्वात शक्तिशाली हायड्रोजन बॉम्बची चाचणी केली होती. यामुळे चीनच्या सीमेवर 6.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्प