No money to buy corona vaccine, Pakistan relies on free vaccine | कोरोना प्रतिबंधात्मक लस खरेदीसाठी पैसेच नाहीत, मोफत लसीच्या भरवशावर पाकिस्तान

कोरोना प्रतिबंधात्मक लस खरेदीसाठी पैसेच नाहीत, मोफत लसीच्या भरवशावर पाकिस्तान

ठळक मुद्देसध्या जगभरात अनेक ठिकाणी सुरू झालंय कोरोना प्रतिबंधात्मक लसीचं लसीकरणभारतानं अनेक देशांना पुरवली लस

जगभरातील अनेक देशांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरूवात झाली आहे. भारतातही या लसीकरणाला सुरूवात झाली असून भारतानं अनेक देशांना आतापर्यंत लसीचा पुरवठा केला आहे. परंतु पाकिस्ताननं भारताकडे लसींची मागणी केली नव्हती. चीननं काही लसी पाकिस्तानला मोफत दिल्या होत्या. परंतु आता मोठी बाब समोर आली आहे. पाकिस्तान आताही मोफत लस मिळण्याच्याच भरवशावर असून यावर्षी पाकिस्तान आपल्या देशातील नागरिकांसाठी लसींची खरेदी करणार नसल्याचं वृत्त एका पाकिस्तानी वृत्तवाहिनीनं दिलं आहे.
 
नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसचे सेक्रेटरी अमिर अशरफ ख्वाजा यांनी गुरूवारी पब्लिक अकाऊंट कमिटीच्या ब्रिफिंगदरम्यान ही माहिती दिली. "इमरान सरकार सध्या महासाथीचा सामना करण्यासाी हर्ड इम्युनिटी आणि आपल्या सहकारी देशांकडून मोफत मिळणाऱ्या लसीच्या पुरवठ्यावर अवलंबून असेल," असं ख्वाजा यांनी सांगितलं. कोरोना विषाणूच्या महासाथीपासून आपल्या देशातील नागरिकांचा बचाव करण्यासाठी अनेक देश मोठ्या प्रमाणात लसींची खरेदी करत आहेत. परंतु या उलट पाकिस्तान लसींची खरेदी करण्याऐवजी आंतरराष्ट्रीय डोनर्स आणि चीनसारख्या देशांवर लसीसाठी मोफत लसीसाठी अवलंबून आहे.

मोफत लसींची वाट 

लोकलेखा समितीचे अध्यक्ष राणा तनवीर हुसैन यांनी नॅशनल हेल्थ सर्व्हिसेसच्या सेक्रेटरींना पाकिस्तान मोफत मिळणाऱ्या लसींची वाट पाहत आहे का असा सवाल केला. यावर उत्तर देताना त्यांनी पाकिस्तानला कोरोनाच्या अधिक लसी खरेदी करण्याची गरजच पडणार नसल्याचं उत्तर त्यांनी दिली. चीनद्वारे विकसित करण्यात आलेल्या कोरोना लसीच्या एका डोसची किंमत १३ डॉलर्स इतकी असल्याची माहिती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ एक्झिक्युटिव्हचे डायरेक्टर मेजर जनरल अमिर इकराम यांनी दिली. 

दरम्यान एनएचएसच्या सेक्रेटरींनी दिलेल्या माहितीनुसार चीनच्या सिनोफार्म या कंपनीनं पाकिस्तानला १० लाख डोस देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यापैकी पाच लाख डोस आतापर्यंत पुरवण्यात आले आहेत. त्यापैकी २ लाख ७५ हजार डोस आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहेत. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: No money to buy corona vaccine, Pakistan relies on free vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.