शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 10:53 IST

अमेरिकेने अणुऊर्जा प्रकल्पांवर केलेल्या हल्ल्यांवर इराणने प्रतिक्रिया दिली.

America Strikes In Iran:इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात आता अमेरिकेने सहभाग घेतला आहे. दोन आठवड्यांचा इशारा देणाऱ्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या तीन प्रमुख अणऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केले. अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला आणि त्यांना नष्ट केले अशी माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. आता अमेरिकेच्या हल्ल्यात कोणतेही नुकसान झालेले नसल्याचे इराणने म्हटलं आहे.

इराण आणि इस्रायलच्या १० दिवसांच्या युद्धानंतर अमेरिकेने इराणवर हल्ला करत तीन अणुऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य केले. यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान प्रकल्पांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. ज्यामध्ये त्यांनी हल्ल्याबद्दल अमेरिकन सैन्याचे अभिनंदन केले. दुसरीकडे इराणने या हल्ल्यानंतर निवेदन जारी करुन अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित असल्याचे म्हटलं आहे.

अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांनंतर नागरिकांसाठी कोणताही धोका नसल्याचे इराणच्या सरकारी माध्यमांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या हल्ल्यामुळे अणुऊर्जा प्रकल्पांचे  कोणतेही नुकसान झालेले नाही आणि नागरिकांना रेडिएशनचा धोका नाही, असं इराणने म्हटलं आहे. मात्र ट्रम्प यांनी आपल्या भाषणात हा हल्ला यशस्वी झाल्याचे म्हटलं होतं. तसेच त्यांनी इशारा देत इराणला शांततेकडे वाटचाल करण्यास सांगितले.

दुसरीकडे, अमेरिकेने अणुप्रकल्पांवर केलेल्या हल्ल्यानंतर सौदी अरेबिया किंवा इतर आखाती देशांमधल्या वातावरणात कोणतेही किरणोत्सर्गी पदार्थ आढळले नसल्याचे सौदी अरेबियाने म्हटले. अणुप्रकल्पांजवळ राहणाऱ्या रहिवाशांना कोणताही धोका नसल्याचे सौदीकडून सांगण्यात आलं.

दरम्यान, इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षाला १० दिवस उलटले आहेत. १३ जूनपासून इराणमध्ये ६५७ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि २००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. तर इराणच्या आरोग्य मंत्रालयाने ४३० नागरिकांचा मृत्यू आणि ३,५०० लोक जखमी झाल्याची माहिती दिली आहे. दुसरीकडे, इस्रायलमध्ये २४ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ९०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

टॅग्स :IranइराणDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIsraelइस्रायलAmericaअमेरिका