शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

ब्रेझा, व्हेन्यूला टक्कर देणार; स्वस्त किंमत ठेवून जगप्रसिद्ध कंपनी बाजार 'खेचणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2020 5:26 PM

छोट्या एसयुव्हींच्या सेगमेंटमध्ये ही सर्वात स्वस्त एसयुव्ही ठरण्याची शक्यता आहे. या एसयुव्हीची टक्कर मारुतीच्या ब्रेझा, टाटाच्या नेक्सॉन, ह्युंदाईच्या व्हेन्यू, महिंद्राच्या एक्सयुव्ही 300 आणि कियाच्या सोनेटसोबत होणार आहे. 

नवी दिल्ली : Nissan आता भारतीय बाजारासह जागतिक बाजारात एक कॉम्पॅक्ट एसयुव्ही उतरवणार आहे. ही एसयुव्ही निसान मॅग्नाइट (Nissan Magnite) नावाने बाजारात आणली जाण्याची शक्यता असून मारुतीच्या ब्रेझा आणि ह्युंदाईच्या व्हेन्यूला टक्कर देणार आहे. या 4 मीटर छोट्या एसयुव्हीचे जागतिक अनावरण 16 जुलैला होणार आहे. आज कंपनीने या एसयुव्हीचा टीझर दाखविला आहे.

या टीझरमध्ये मॅग्नाईटचा पुढील लूक दिसत असून मोठे व्हील आर्च, ऑफ रोड टायरसोबत मोठे व्हील आणि स्कफ प्लेटस् देण्यात आले आहेत. यानुसार हे फोटो कॉन्सेप्ट मॉडेलचे असल्याचे स्पष्ट होते. मात्र, या फोटोतून मॅग्नाईटची आणखी काही माहिती समोर आली आहे. 

मॅग्नाईटमध्ये शार्प लूकच्या एलईडी हेडलाईट देण्यात येणार आहेत. ज्या निसान किक्स एसयुव्हीसारख्या दिसतात. तर या मॅग्नाईटचे L-आकाराचे डीआरएल हे नुकतीच लाँच झालेल्या दॅटसनच्या रेडी-गो फेसलिफ्टसारखे आहेत. मॅग्नाईटला मोठी ग्रील देण्यात आली आहे. फोटोवरून हे स्पष्ट होत आहे की, एसयुव्हीच्या साईडला मोठे बॉडी क्लॅडिंग असणार आहे. 

निसानच्या मॅग्नाईटमध्ये दोन इंजिन ऑप्शन असणार आहेत. यामध्ये 72hp ताकदीचे 96Nm टॉर्कवाले 1.0-लीटर, 3 सिलिंडर पेट्रोल इंजिन असणार आहे. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि एएमटीचा पर्याय मिळणार आहे. दुसरे इंजिन 1.0 लीटरचेच परंतू 3-सिलिंडर टर्बो-पेट्रोल इंजिन असणार आहे. जे  95hp ची ताकद दोणार आहे. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि सीव्हीटी गिअरबॉक्सचा पर्याय असण्याची शक्यता आहे. 

किंमत किती असेल? निसानच्या या छोट्या एसयुव्हीची किंमत 5.25 लाख रुपयांपासून सुरु होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर सीव्हीटीसह टर्बो-पेट्रोल इंजनच्या मॉडेलची किंमतही 6 लाखांच्या आसपास ठेवण्यात येणार असल्याची चर्चा आहे. यामुळे छोट्या एसयुव्हींच्या सेगमेंटमध्ये ही सर्वात स्वस्त एसयुव्ही ठरण्याची शक्यता आहे. या एसयुव्हीची टक्कर मारुतीच्या ब्रेझा, टाटाच्या नेक्सॉन, ह्युंदाईच्या व्हेन्यू, महिंद्राच्या एक्सयुव्ही 300 आणि कियाच्या सोनेटसोबत होणार आहे. 

केव्हा लाँचिंग?ही एसयुव्ही ऑगस्ट 2020 मध्येच लाँच होणार होती. मात्र, या कोरोनामुळे या कारची लाँचिंग टाळण्य़ात आले. आता ही एसयुव्ही 16 जुलैला जगासमोर आणण्यात येणार असली तरीही ती 2021 मध्येच भारतात लाँच केली जाण्याची शक्यता आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

आता नितीन गडकरी उतरले मैदानात; चिनी कंपन्यांना दणका देण्याचा जबरदस्त 'हायवे प्लॅन' तयार

लॉकडाऊनमध्ये सरकारी नोकऱ्यांचा पाऊस! ग्रामीण बँकांमध्ये बंपर भरती; IBPS द्वारे करा अर्ज

गावाकडे चला! SBI मध्ये नोकरीची मोठी संधी; 25000 रुपयांपर्यत पगार

झोपच उडाली! गुराख्याला कोरोना झाला; कर्नाटकात 47 बकऱ्या केल्या क्वारंटाईन

नक्कलबाजीने चीनला पोखरले! सर्वात मोठा घोटाळा; 83 टन सोने बनावट निघाले

तब्बल 40000 रुपयांनी स्वस्त झाला आयफोन; जाणून घ्या किंमत

टॅग्स :Nissanनिस्सानMarutiमारुतीHyundaiह्युंदाईTataटाटाKia Motars Carsकिया मोटर्स