फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:19 IST2025-07-14T12:18:24+5:302025-07-14T12:19:39+5:30

Nimisha Priya Yemen: येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला येत्या दोन दिवसांत फाशी दिली जाणार आहे.

Nimisha Priya Yemen: Not just Nimisha, 'so many' Indians sentenced to death in prisons around the world | फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा

फक्त निमिषाच नाही, तर जगभरातील तुरुंगात 'इतक्या' भारतीयांना झाली मृत्युदंडाची शिक्षा

Nimisha Priya Yemen: केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील ३८ वर्षीय नर्स निमिषा प्रिया हिला २०१७ मध्ये येमेन देशात एका हत्येप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. निमिषाला येत्या दोन दिवसांत फाशी दिली जाणार आहे. तिला वाचवण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. ब्लड मनी देण्याचा प्रस्तावदेखील दिला आहे. पण, अद्याप येमेन सरकारकडून या प्रकरणावर कुठलीही ठोस कारवाई झालेली नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, निमिषा प्रियाला २०२० मध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. येत्या १६ जूलै रोजी तिला फाशी देण्यात येणार आहे. कुटुंबासह भारत सरकारकडून तिला वाचवण्याचे सर्व प्रयत्न सुरू आहे. दरम्यान, भारतीयाला परदेशात फाशीची शिक्षा झाल्याचे हे पहिलेच प्रकरण नाही. 

परदेशातील भारतीयांना मृत्युदंडाची शिक्षा
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, परदेशी न्यायालयांनी मृत्युदंडाची शिक्षा दिलेल्या भारतीय नागरिकांची संख्या ५४ आहे. ज्यामध्ये कुवेत, कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती यांचा समावेश आहे. युएईमध्ये सर्वाधिक २९ भारतीयांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे, त्यानंतर सौदीमध्ये १२, कुवेतमध्ये ३ आणि कतारमध्ये १ भारतीय आहे.

निमिषाची फाशी थांबवली जाईल का?
निमिषाची फाशी थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. निमिषाच्या कुटुंबाने सर्वोच्च न्यायालयात ब्लड मनीची रक्कम मंजूर करण्याची विनंती केली आहे, जेणेकरुन पीडित कुटुंबाला पैसे देऊन निमिषाची शिक्षा माफ करता येईल. यासाठी निमिषाच्या कुटुंबाने १० लाख डॉलर्सचा प्रस्ताव मांडला आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून निमिषाचा जीव वाचवण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. 

Web Title: Nimisha Priya Yemen: Not just Nimisha, 'so many' Indians sentenced to death in prisons around the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.