जस्टीन ट्रुडोंची हकालपट्टी होताच निज्जर हत्याकांडातील आरोपींना मिळाला जामीन
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 13:39 IST2025-01-09T13:37:56+5:302025-01-09T13:39:18+5:30
कॅनडा सरकारला हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. निज्जर हत्याकांडावरून ट्रुडो यांनी भारताशी पंगा घेतला होता.

जस्टीन ट्रुडोंची हकालपट्टी होताच निज्जर हत्याकांडातील आरोपींना मिळाला जामीन
कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांना त्यांच्या पक्षाने पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. लोकप्रियता घसरल्याने येत्या निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता, तसेच भारतासोबतचा वाद यामागे आहे. ट्रुडो यांच्या राजीनाम्याच्या दोन दिवसांनीच खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग नज्जर हत्याकांडातील सर्व चार आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
कॅनडा सरकारला हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. निज्जर हत्याकांडावरून ट्रुडो यांनी भारताशी पंगा घेतला होता. भारताचा या हत्येमागे हात असल्याचे सांगत आपल्या भूमीवर या गोष्टी चालू देणार नसल्याची भुमिका त्यांनी घेतली होती. तसेच त्यांनी भारतावर गंभीर आरोप केले होते. यात भारताच्या एका बड्या नेत्याचा हात असल्याचेही म्हटले होते.
भारताशी पंगा घेण्याचे प्रकरण त्यांच्या अंगाशी आले होते. भारताने कॅनडाच्या बहुतांश राजनैतिक अधिकाऱ्यांना भारतातून जाण्यास भाग पाडले होते. निज्जर हा भारतविरोधी कारवाया करत होता. खलिस्तान्यांनी कॅनडात आश्रय घेतलेला आहे. तिथे भारताविरोधात कटकारस्थाने रचली जातात, तरीही ट्रुडो या खलिस्तानींना खूष करण्यासाठी भारताविरोधात गरळ ओकत होते.
निज्जर हत्याकांडातील करण बराड, कमलप्रीत सिंग, करणप्रीत सिंग आणि अमनदीप सिंग यांना अटक करण्यात आली होती. यावर ब्रिटिश कोलंबिया सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु होती. कोर्टाने त्यांना जामिन मंजूर केला आहे. पुढील सुनावणी ११ फेब्रुवारीला होणार आहे.
खालिस्तानी हरदीप सिंह निज्जर मर्डर केस में कनाडा सरकार को बड़ा झटका लगा है. सभी चारों आरोपियों को जमानत दे दी गई है. इस मामले पर अब अगली सुनवाई 11 फरवरी को होगी.