new zealand stops entry for traveler from india coronavirus cases incresed rules applied to their citizens too | Coronavirus : न्यूझीलंडचा मोठा निर्णय; भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर देशात प्रवेश बंदी

Coronavirus : न्यूझीलंडचा मोठा निर्णय; भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर देशात प्रवेश बंदी

ठळक मुद्देभारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर न्यूझीलंडचा निर्णयन्यूझीलंडच्या नागरिकांसाठीही लागू होणार नियम

गेल्या काही दिवासांपासून कोरोनानं पुन्हा डोकं वर काढण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, काही दिवसांपासून देशात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची नोंद होत आहे. अशा परिस्थितीत न्यूझीलंडनं मोठा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडनंभारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. ११ एप्रिलपासून हा नियम लागू होईल. 

न्यूझीलंडनं घातलेली ही बंदी तात्पुरत्या कालावधीसाठी असेल. भारतातून न्यूझीलंडमध्ये येणाऱ्या प्रवाशांवर ११ एप्रिल ते २८ एप्रिलपर्यंत बंदी असेल. न्यूझीलंडमध्ये ११ एप्रिल संध्याकाली ४ वाजल्यापासून हा नियम लागू होईल अशी घोषणा न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डेन यांनी केली. हा नियम भारतातून न्यूझीलंडमध्ये परतणाऱ्या न्यूझीलंडच्या नागरिकांसाठीही लागू असेल. जर न्यूझीलंडचा नागरिक भारतातून या कालावधीत न्यूझीलंडमध्ये जाऊ इच्छित असेल तर त्यालाही परवानगी देण्यात येणार नाही. तसंच त्या व्यक्तीला २८ एप्रिलनंतर न्यूझीलंडला जावं लागेल. दरम्यान, ही बंदी पुढेही कायम राहिल किंवा नाही याचा निर्णय परिस्थितीनुसार त्यावेळी घेण्यात येणार असल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या न्यूझीलंमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून हा निर्णय लागू करण्यात आला आहे. दरम्यान शुक्रवारपासून देशात IPL च्या चौदाव्या सीझनची सुरूवात होणार आहे. यामध्ये न्यूझीलंडचेही अनेक खेळाडू सहभागी होणार आहेत.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: new zealand stops entry for traveler from india coronavirus cases incresed rules applied to their citizens too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.