'पत्नी ओरडत होती म्हणून मी उडत्या विमानातून तिला खाली समुद्रात फेकलं'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 11:48 AM2021-10-22T11:48:39+5:302021-10-22T11:52:04+5:30

New York Crime News : रॉबर्ट बिरेनबाम म्हणाला की, 'मी अपरिपक्व होतो आणि मला समजत नव्हतं की, मी माझ्या रागावर कसं नियंत्रण मिळवायचं'.

New York plastic surgeon doctor killed his wife and throw her out of plane in sea | 'पत्नी ओरडत होती म्हणून मी उडत्या विमानातून तिला खाली समुद्रात फेकलं'

'पत्नी ओरडत होती म्हणून मी उडत्या विमानातून तिला खाली समुद्रात फेकलं'

Next

New York Crime News : १९८५ मध्ये आपल्या पत्नीच्या हत्येत दोषी ठरवण्यात आलेला न्यूयॉर्क (New York) शहरातील एक माजी प्लास्टिक सर्जन ३० पेक्षा अधिक वर्ष तो निर्दोष असल्याचं सांगत होता. या माजी प्लास्टिक सर्जनचं नाव रॉबर्ट बिरेनबाम आहे, जो एक अनुभवी पायलटही होता. त्याने त्याची पत्नी गेल काट्जची गळा दाबून हत्या केली आणि तिचा मृतदेह विमानातून बाहेर फेकला होता. 

रॉबर्ट बिरेनबाम म्हणाला की, 'मी अपरिपक्व होतो आणि मला समजत नव्हतं की, मी माझ्या रागावर कसं नियंत्रण मिळवायचं'. तो म्हणाला की, 'मला असं वाटत होतं की, तिने माझ्यावर ओरडणं बंद करावं, मग मी तिच्यावर हल्ला केला, ती बेशुद्ध झाली, मग तिला त्याच अवस्थेत मी विमानाने समुद्राच्या वर घेऊन गेलो, विमानाचा दरवाजा उघडला आणि तिचा मृतदेह खाली फेकला'.

पत्नीच्या हत्येप्रकरणी रॉबर्ट बिरेनबामला दोषी ठरवत मॅनहॅटनचे एक माजी सहायक जिल्हा  अटॉर्नी डॅन बिब म्हणाले की, 'पृथ्वीचा 'देव' बनत असलेला हा माणूस एक मनोरूग्ण होता'. रॉबर्ट आणि गेल यांना ओळखणाऱ्या एका व्यक्तीने सांगितलं की, 'मी कधीच विचार केला नव्हता की, डॉ.बिरेनबामचं नाव एका खून्याच्या रूपात सांगावं लागेल'. 

तो म्हणाला की, 'मी हैराण झालो कारण मी कधीच विचार केला नव्हता की, कधी हा दिवस येईल जेव्हा तो आपल्या पत्नीला मारल्याची जबाबदारी घेईल'. गेलच्या बहिणीने दावा केला की, तिला संशय होता की, बिरेनबामने गेलची हत्या केली, हा संशय तिला  तिची बहीण बेपत्ता होती तेव्हा आला होता.

रॉबर्ट बिरेनबाम आणि गेल १९८० दशकाच्या सुरूवातीला भेटले होते आणि त्यांच्या मित्रांनी त्यांच्या भेटण्याला जादुई रोमान्स म्हटलं होतं. पण लवकरच दोघांचे वाद होऊ लागले होते. त्यांचे सतत खटके उडू लागले होते. गेलीच्या बहिणीनुसार, बिरेनबामने लग्नाआधी आपल्या हिंसक प्रवृत्ती दाखवणं सुरू केलं होतं, एकदा रॉबर्टने गेलच्या मांजरीला बुडवण्याचा प्रयत्न केला होता.
 

Web Title: New York plastic surgeon doctor killed his wife and throw her out of plane in sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.