न्यूयॉर्कच्या महापौरांचा ट्रम्प यांना कॉल अन् 'त्या' तरुणीची तुरुंगातून सुटका; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 10:27 IST2026-02-27T10:27:18+5:302026-02-27T10:27:58+5:30

न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी चक्क राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा करून एका तरुणीची 'इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट'च्या ताब्यातून सुटका करून घेतली आहे.

New York Mayor's call to Trump and 'that' young woman's release from prison; Find out what the real story is? | न्यूयॉर्कच्या महापौरांचा ट्रम्प यांना कॉल अन् 'त्या' तरुणीची तुरुंगातून सुटका; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

न्यूयॉर्कच्या महापौरांचा ट्रम्प यांना कॉल अन् 'त्या' तरुणीची तुरुंगातून सुटका; जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

अमेरिकेतील राजकारण सध्या एका वेगळ्याच घटनेमुळे ढवळून निघाले आहे. न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी चक्क राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा करून एका तरुणीची 'इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट'च्या ताब्यातून सुटका करून घेतली आहे. एल्मिना अघायेवा असे या तरुणीचे नाव असून, तिच्या अटकेमुळे अमेरिकेतील विद्यार्थी वर्गात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, महापौरांच्या मध्यस्थीनंतर अवघ्या काही तासांतच तिला सोडून देण्यात आले आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

नेमकं प्रकरण काय?

२६ फेब्रुवारी रोजी एल्मिनाला 'डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी'ने ताब्यात घेतले होते. तिचा स्टुडंट व्हिसा २०१६ मध्येच संपला असल्याची माहिती समोर आली होती. व्हिसा संपल्यानंतरही अमेरिकेत वास्तव्यास असल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली होती. अनेक तास ती कस्टडीत होती. या घटनेची माहिती मिळताच न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी तातडीने हालचाली केल्या आणि थेट राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी या विषयावर चर्चा केली.

कोण आहे ही एल्मिना?

एल्मिना अघायेवा ही मूळची अझरबैजानची रहिवासी असून ती सध्या अमेरिकेतील अत्यंत प्रतिष्ठित अशा कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत आहे. ती युनिव्हर्सिटीच्या 'स्कूल ऑफ जनरल स्टडीज'मध्ये सीनियर असून न्यूरोसायन्स आणि पॉलिटिकल सायन्स या विषयांत पदवी घेत आहे. केवळ अभ्यासातच नाही, तर सोशल मीडियावरही एल्मिनाचा मोठा दबदबा आहे. ती एक नामांकित सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून तिचे १ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

महापौरांनी दिली सोशल मीडियावर माहिती

जोहरान ममदानी यांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. त्यांनी लिहिले की, "आमच्या मागील बैठकीत मी कोलंबिया युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी एल्मिना अघायेवा हिच्याबद्दल माझी चिंता व्यक्त केली होती. तिला सकाळी ICEने ताब्यात घेतले होते. पण आता मला सांगण्यात आले आहे की, तिची लवकरच सुटका केली जाईल." महापौरांच्या या पोस्टनंतर काही वेळातच एल्मिनाला सोडून देण्यात आले.

सुटकेनंतर एल्मिनाची पहिली प्रतिक्रिया

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर एल्मिनाने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. तिने पोस्टमध्ये म्हटले आहे की, "मी तुम्हा सर्वांची खूप आभारी आहे. मी आत्ताच बाहेर आले आहे आणि सुरक्षित आहे. मात्र, गेल्या काही तासांत जे काही घडले, त्या धक्क्यातून मी अद्याप सावरलेली नाही."

Web Title : न्यूयॉर्क के मेयर ने ट्रम्प को किया कॉल, छात्रा रिहा; जानिए मामला

Web Summary : न्यूयॉर्क के मेयर ने राष्ट्रपति ट्रम्प को फोन कर एक छात्रा को ICE हिरासत से छुड़ाया। एल्मिना अघायेवा, वीजा समस्या के कारण पकड़ी गई, हस्तक्षेप के बाद तुरंत रिहा हुई। वह एक छात्रा और सोशल मीडिया इन्फ्लुएंसर हैं।

Web Title : NY Mayor's Call to Trump Frees Student; Here's the Story

Web Summary : New York's Mayor secured a student's release from ICE custody after calling President Trump. Elmina Aghayeva, held due to visa issues, was freed swiftly after the intervention. She is a student and social media influencer.