Mehul Choksi: मेहुल चोक्सी प्रकरणाला नवे वळण; भारतीय विमान डग्लस-चार्ल्सस विमानतळावर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 10:53 IST2021-07-14T10:53:47+5:302021-07-14T10:53:59+5:30
मेहुल चोक्सी हा पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळ्यात फरार आहे हे या दस्तावेजातून डोमिनिका उच्च न्यायालयासमोर सिद्ध करायचे होते.

Mehul Choksi: मेहुल चोक्सी प्रकरणाला नवे वळण; भारतीय विमान डग्लस-चार्ल्सस विमानतळावर
डोमिनिका : फरार हिरे व्यावसायिक मेहुल चोक्सी याला डोमिनिका उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला असला तरी इंडियन एअर फोर्सचे विमान डग्लस-चार्ल्स विमानतळावर उतरले आणि चोक्सी प्रकरणाला नवे वळण मिळाले. गेल्या २८ मे रोजी कातार एक्झिक्युटिव्ह एअरलाईन्सचे विमान केंद्रीय गुप्तचर खाते (सीबीआय) आणि सक्तवसुली संचालनालय अधिकाऱ्यांसह देशात आले होते. या अधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत दस्तावेज आणले होते.
मेहुल चोक्सी हा पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळ्यात फरार आहे हे या दस्तावेजातून डोमिनिका उच्च न्यायालयासमोर सिद्ध करायचे होते. तथापि, या प्रकरणाची सुनावणी अनेक आठवड्यांसाठी तहकूब केली गेल्यामुळे हे विशेष विमान तीन जून रोजी रात्री ८.१० वाजता तेथून निघाले. मेहुल चोक्सी व त्याचा पुतण्या नीरव मोदी या दोघांवर पंजाब नॅशनल बँकेचे १३,५०० कोटी रूपये लेटर्स ऑफ अंडरटेकिंगचा वापर करून बुडवल्याचा आरोप आहे. चोक्सी याने नोव्हेंबर २०१७ मध्ये अँटिगुआ आणि बरबुडाचे नागरिकत्व घेतले.