शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

भारताला धोका! दोन दहशतवादी संघटना एकत्र आल्या; अफगाणमध्ये 'तहरीक-ए-तालिबान अमिरात'ची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2021 13:34 IST

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबाननं कब्जा केल्यानंतर भारतासाठी संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. कारण तालिबान्यांकडून अफगाणिस्तानात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना आश्रय दिला जाऊ शकतो अशी दाट शक्यता आहे.

अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबाननं कब्जा केल्यानंतर भारतासाठी संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. कारण तालिबान्यांकडूनअफगाणिस्तानातदहशतवादी कारवाया करणाऱ्यांना आश्रय दिला जाऊ शकतो अशी दाट शक्यता आहे. आता हिच भीती खरी ठरताना दिसत आहे. कारण एका गुप्तचर अहवालानुसार अफगाणिस्तानात दहशतवाद्यांचं एक नवं नेटवर्क अस्तित्वात आणलं जात आहे. याच नाव 'तहरीक-ए-तालिबान अमिरात' असं ठेवण्यात आलं आहे. पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैय्यबा आणि हक्कानी नेटवर्कनं एकत्र येत या नव्या संघटनेची स्थापना केल्याची माहिती समोर आली आहे. 

जैश-ए-मोहम्मद संघटना सर्वात ताकदवान दहशतवादी संघटना म्हणून गेल्या काही काळापासून पुढे आली आहे. यातच जैशचा म्होरक्या मसूद अजहर आणि मोहम्मद इब्राहिम अजहर यांना अफगाणिस्तानातील ऑपरेशनसाठी समन्वय राखण्याची जबाबदारी देण्यात आली होती. दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात ट्रेनिंग देण्याचा जैशचा मनसुबा आहे. यातून ट्रेनिंग घेतलेले दहशतवादी तालिबानच्या नव्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यासाठी मदत करतील. जैश-ए-मोहम्मदच्या अनेक कुख्यात दहशतवाद्यांना अफगाणिस्तानातील ऑपरेशनसाठी पाठविण्यात आलं आहे याचीही माहिती मिळाल्याचं सांगण्यात येत आहे. 

हक्कानी नेटवर्कला तालिबानमध्ये मिळणार आश्रयहक्कानी नेटवर्कचे इस्लामिक स्टेट (आयसिस) या दहशतवादी संघटनेसोबत संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. अशातच हक्कानी नेटवर्कमुळे भारताच्या चिंतेत भर पडली आहे. अफगाणिस्तानात सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे आणि यात हक्कानी नेटवर्कला देखील स्थान मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. हक्कानी नेटवर्कनं आजवर अनेक आत्मघाती हल्ले केले आहेत. यात सामान्य नागरिकांसह परदेशी नागरिक आणि सैनिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. हक्कानी नेटवर्कचे पाकिस्तानच्या आयएसआयशी देखील संबंध आहेत. त्यामुळे भारतासाठी ही चिंतेची बाब म्हटली जात आहे. 

पाकिस्तानचे दहशतवादी अफगाणिस्तानात घेतील ट्रेनिंगतालिबानचं पुनरागमन भारतासह आणि काही देशांसाठी डोकेदुखी ठरू शकतं याचा अंदाज याआधीच आला होता. पाकिस्तानचे तालिबान्यांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे भारत विरोधी कारवायांमध्ये तालिबान पाकिस्तानला मदत करू शकतं. पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेणारे दहशतवादी आता अफगाणिस्तानात जाऊन बिनधास्तपणे ट्रेनिंग सुरू करतील आणि त्याची व्याप्ती देखील वाढेल असा धोका व्यक्त करण्यात आला आहे. अर्थात तालिबानकडून अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होऊ देणार नाही अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. पण त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा देखील मोठा प्रश्न आहे. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानTerrorismदहशतवादPakistanपाकिस्तान