शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

नवा इतिहास : सौदीच्या आकाशातून इस्राइलला गेले भारताचे पहिले विमान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 10:29 IST

भारत आणि इस्राइल यांच्यातील संबंधांचा एक नवा आध्याय गुरुवारी लिहिला गेला. गुरुवारी एअर इंडियाचे विमान पहिल्यांदाच सौदी अरेबियाच्या आकाशातून प्रवास करत इस्त्राइलमधील बेन गुरियन एअरपोर्टवर पोहोचले.

बेन गुरियन - भारत आणि इस्राइल यांच्यातील संबंधांचा एक नवा आध्याय गुरुवारी लिहिला गेला. गुरुवारी एअर इंडियाचे विमान पहिल्यांदाच सौदी अरेबियाच्या आकाशातून प्रवास करत इस्त्राइलमधील बेन गुरियन एअरपोर्टवर पोहोचले. सौदी अरेबियाने इस्राइलला जाणाऱ्या विमानांना आपल्या आकाशाचा वापर करू देण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारतातून इस्राइलला जाणाऱ्या आणि इस्राइलहून भारताकडे जाणाऱ्या विमानांना आपल्या हवाई हद्दीतून प्रवास करण्याची परवानगी देण्याचे संकेत सौदी अरेबियाने हल्लीच दिले होते. एअर इंडियाचे 139 विमान तब्बल साडे सात तासांचा प्रवास करून गुरुवारी बेन गुरियन विमानतळावर पोहोचले. सौदी अरेबियाच्या धोरणात आलेला हा मोठा बदल आहे. इराण आणि सौदी अरेबियामध्ये असलेले तणावपूर्ण संबंध हे सौदीच्या इस्राइलकडे झुकण्याचे कारण मानले जात आहे. "हा खरोखरच एक ऐतिहासिक दिवस आहे. दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनंतर हे शक्य झाले आहे,"अशी प्रतिक्रिया इस्राइलचे पर्यटनमंत्री यारिव लेविन यांनी दिली.  लेविन म्हणाले, "सौदीच्या आकाशातून भारतीय विमानांची ये जा वाढल्याने प्रवासातील वेळ कमी होईल. त्यामुळे प्रवासातील वेळ सुमारे दोन तासांनी कमी होईल. याशिवाय तिकिटांचे दरही कमी होतील." ज्यू बहुसंख्य असलेल्या इस्राइलला इस्लामिक देशांकडून राष्ट्राचा दर्जा मिळालेला नाही. मात्र सध्या सौदी अरेबियाने दिलेली सवलत ही केवळ भारतीय विमानांसाठी आहे. इस्राइली विमानांसाठी अशी सवलत देण्याचे कोणतेही संकेत सौदीकडून देण्यात आलेले नाहीत.  

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाIndiaभारतIsraelइस्रायलsaudi arabiaसौदी अरेबिया