शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

पाकच्या नव्या सरकारनेही जाधव यांच्याविरोधात ओकली गरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 17:13 IST

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली गेलेल्या कुलभूषण जाधव यांच्या विरोधात नव्या सरकारनेही गरळ ओकली आहे. जाधव यांच्या विरोधात पाकिस्तानकडे पक्के पुरावे असल्याचे नवे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयात फाशीच्या शिक्षेविरोधात सुरु असलेला खटला आपणच जिंकणार असल्याची दर्पोक्ती त्यांनी केली ...

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा सुनावली गेलेल्या कुलभूषण जाधव यांच्या विरोधात नव्या सरकारनेही गरळ ओकली आहे. जाधव यांच्या विरोधात पाकिस्तानकडे पक्के पुरावे असल्याचे नवे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सांगितले आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय न्यायालयात फाशीच्या शिक्षेविरोधात सुरु असलेला खटला आपणच जिंकणार असल्याची दर्पोक्ती त्यांनी केली आहे. 

कुलभूषण जाधव यांना एप्रिल, 2017 मध्ये पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. या खटल्याचा निकाल पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये लागण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांनी युक्तीवाद केला आहे. 

कुरेशी यांनी मुल्तानच्या प्रसिद्धीमाध्यमांसमोर जाधव यांच्या विरोधात भक्कम पुरावे असल्याचे सांगत आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये आपलाच विजय होणार असल्याचे सांगितले. पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी जाधव यांना मार्च 2016 मध्ये बलुचिस्तानमधून ताब्यात घेतले होते. जाधव हे इराणमार्गे पाकिस्तानात घुसखोरी करत होते, असा दावा करण्यात आला आहे. 

आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये पाककडून असा युक्तीवाद करण्यात आला आहे की, कुलभूषण जाधव हे काही साधारण व्यक्ती नसून ते भारताचे हेर आहेत. ते पाकमध्ये काहीतरी घातपात करण्याच्या उद्देशाने येत होते. या पाकच्या आरोपांना भारताने फेटाळले होते. पाकने जाधव यांचे इराणमध्ये अपहरण केले होते. जाधव हे नौदलातून निवृत्त झाल्यानंतर ते आपला व्यवसाय करण्यासाठी इराणमध्ये गेले होते. मात्र, सरकारशी त्यांचा काही संबंध नव्हता.

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधवPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानIndiaभारतIranइराण