नेपाळमध्ये भीषण अपघात, बस उलटल्याने 13 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 21:12 IST2022-12-13T21:10:42+5:302022-12-13T21:12:09+5:30

Nepal Road Accident : ही घटना मध्य नेपाळमधील कावरेपाल्चोक जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी घडली. 

Nepal Road Accident : Bus Overturned In Kavrepalanchok District Of Central Nepal | नेपाळमध्ये भीषण अपघात, बस उलटल्याने 13 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी

नेपाळमध्ये भीषण अपघात, बस उलटल्याने 13 जणांचा मृत्यू, 20 जण जखमी

नेपाळमध्ये एका भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. नेपाळमध्ये बस उलटून झालेल्या भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 20 जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मध्य नेपाळमधील कावरेपाल्चोक जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी घडली. 

कावरेपाल्चोकच्या एसपींनी याबाबत माहिती दिली आहे. कावरेपाल्चोक एसपींनी एएनआयला दिलेल्या माहितीनुसार, "स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6.30 च्या सुमारास एका धार्मिक कार्यक्रमातून लोकांना घेऊन जाणाऱ्या बसचा अपघात झाला. या अपघातात 20 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



 

Web Title: Nepal Road Accident : Bus Overturned In Kavrepalanchok District Of Central Nepal

टॅग्स :Nepalनेपाळ