शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

कोण आहेत बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 15:17 IST

पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर बालेन यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याची मागणी सुरू झाली आहे.

नेपाळमध्ये सध्या मोठा संघर्ष सुरू झाला आहे. लाखो युवक रस्त्यावर उतरले आहेत. सोशल मीडियावरील बंदीविरोधात सुरू झालेल्या या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. या आंदोलनात २० हून अधिक युवकांचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त जमावाने नेपाळमध्ये संसदेसह मंत्र्‍यांच्या घरांना लक्ष्य केले. या आंदोलनामुळे नेपाळमधील सरकार कोसळण्याचे संकट उभे राहिले आहे. त्यात पंतप्रधान केपी शर्मा ओली देश सोडण्याच्या तयारीत आहेत. नेपाळमधील या आंदोलनाला Gen Z असं नाव दिले आहे. या संपूर्ण घडामोडीत एक नाव प्रामुख्याने समोर आले ते म्हणजे बालेन शाह

बालेन शाह काठमांडूचे महापौर आहेत. बालेन नेपाळमधील युवकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यामुळे इतर लोकप्रतिनिधींहून ते वेगळे आहेत. याठिकाणचे बहुतांश महापौर त्यांच्या नगरपालिकांच्या पुढे फार काही लक्ष देत नाहीत. परंतु बालेन शाह नेपाळमधील या मोठ्या आंदोलनात केंद्रस्थानी आले आहेत. नेपाळ न्यूजनुसार, बालेनचं व्यक्तिमत्व आणि त्यांचा प्रभाव यावरून अंदाज केला जातो, की टाइम मॅग्जिनमध्ये २०२३ साली १०० प्रतिष्ठित व्यक्तींमध्ये त्यांच्या नावाचा समावेश होता. द न्यूयॉर्क टाइम्ससारख्या प्रतिष्ठित मिडिया संस्थांनीही त्यांची दखल घेतली आहे.

बालेन शाह यांची युवकांमध्ये मोठी क्रेझ आहे. कायम त्यांच्या सोशल मिडिया पोस्टमुळे राष्ट्रीय पातळीवर वाद-विवाद उभे राहतात. त्यांच्या पोस्ट वेगाने ट्रेंड होतात. बालेन यांची जीवनशैली, राहण्याची स्टाईल सर्वकाही तिथल्या युवकांसाठी एक रोल मॉडेल आहे. त्यामुळेच नेपाळमधील या आंदोलनाला पाठिंबा देत बालेन यांनी सहजपणे हे आंदोलन हायजॅक केले. बालेन शाह यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात सिव्हिल इंजिनिअर म्हणून केली. त्यानंतर रॅपर म्हणूनही त्यांची नशीब आजमावलं. बालेन शाह यांनी राजकारणात प्रवेश करताच काठमांडू येथील मेयर पदाची निवडणूक लढवली आणि जिंकली. युवकांमध्ये लोकप्रियता, त्याच त्याच राजकीय पक्षांना कंटाळलेले नेपाळी युवक यांनी बालेन शाह यांना तिथे नायक बनवले. 

भारतीय सिनेमाला केला होता विरोध

२०२३ साली रामायणावर आधारित आदिपुरुष सिनेमा आला होता. त्यावेळी काठमांडूचे मेयर बालेन शाह यांनी या सिनेमातील काही संवादावर आक्षेप घेतला आणि ती वाक्य सिनेमातून हटवण्याची मागणी केली होती. जर सिनेमा निर्मात्यांनी असे केले नाही तर नेपाळ आणि काठमांडू येथे भारतीय सिनेमा प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशाराही बालेन शाह यांनी दिला होता. 

आंदोलनाचं केंद्रबिंदू कसे बनले?

नेपाळमध्ये राजकीय नेत्यांच्या मुलांची हायप्रोफाईल जीवनशैलीविरोधात सोशल मीडियात #Nepokid ट्रेंड करू लागला. त्यानंतर सरकारने इंटरनेट आणि सोशल मीडियावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जेन झेड आंदोलन सुरू झाले. देशात शांततेत सुरू असणाऱ्या या आंदोलनावर पोलिसांनी कठोर भूमिका घेतली. पोलीस कारवाईत २० हून अधिक आंदोलनकर्ते मारले गेले. त्यामुळे युवकांमध्ये असंतोष पसरला. बालेन शाह यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला. त्यामुळे हिरो म्हणून ते आंदोलनात पुढे आले. 

दरम्यान, पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्यानंतर बालेन यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याची मागणी सुरू झाली आहे. गृह मंत्री रमेश लेखक यांनी आंदोलनकर्त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचा राजीनामा सुपूर्द केला आहे. आतापर्यंत ३ मंत्र्‍यांनी राजीनामा दिला. केपी शर्मा ओली देश सोडण्याच्या तयारीत आहेत. त्याचवेळी आंदोलनकर्ते बालेन शाह यांची तुलना थेट पंतप्रधानांसोबत करत आहेत. त्यांनी मेयरपदाचा राजीनामा देऊन देशाचे नेतृत्व करावे असा आग्रह आंदोलक युवक करत आहेत. फेसबुकवर नेपाळी युवक बालेन यांच्याकडे नवीन राजकीय पक्ष बनवून देशाचे नेतृत्व करावे असं आवाहन करत आहेत.  

टॅग्स :NepalनेपाळSocial Mediaसोशल मीडिया