शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
2
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
3
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
4
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
5
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
6
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
7
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
8
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
9
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
10
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
11
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
12
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

'भारतातील अयोध्या बनावट, खरी अयोध्या नेपाळमध्ये; प्रभू राम भारतीय नव्हते, ते तर नेपाळी'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 9:13 PM

नेपाळच्या पंतप्रधानांचा दावा; भारतानं सांस्कृतिक अतिक्रमण केल्याचा आरोप

काठमांडू: राजकीय संकटात सापडल्यानं खुर्ची जाण्याची भीती असलेले नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आता भारतावर निशाणा साधला आहे. भारतानं सांस्कृतिक अतिक्रमण करून बनावट अयोध्या निर्माण केली. खरीखुरी अयोध्यानेपाळमध्ये आहे. प्रभू राम भारतीय नसून ते नेपाळी आहेत, असा दावादेखील ओली यांनी केला. आपल्याला पंतप्रधान पदावरून दूर करण्यासाठी भारताकडून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप याआधी ओली यांनी केला होता.गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं भारतविरोधी भूमिका घेणारे केपी शर्मा ओली सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांचं पंतप्रधानपद धोक्यात आहे. ते टिकवण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आता त्यांनी थेट भारतावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. नेपाळवर सांस्कृतिक अत्याचार करण्यात आले. ऐतिहासिक तथ्यांची मोडतोड करण्यात आली, असं ओली कवी भानुभक्त आचार्य जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात म्हणाले. राजपुत्र असलेल्या रामाला आम्ही सीता दिली, असं आम्ही आजही मानतो. मात्र आम्ही भारतात असलेल्या अयोध्येच्या राजकुमाराला सीता दिली नाही. अयोध्या नावाचं गाव बीरगंजच्या पश्चिमेला आहे. मात्र भारतातील अयोध्या खरीखुरी नाही, असा दावादेखील ओली यांनी केली. भारतातील अयोध्या खरी असेल तर मग तिथला राजकुमार लग्नासाठी जनकपूरला कसा येऊ शकतो, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. विज्ञान आणि ज्ञानाची उत्पत्ती आणि विकास नेपाळमध्ये झाल्याचा दावाही त्यांनी केला.केपी शर्मा ओली यांच्या राजीनाम्याची मागणीनेपाळमध्ये गेल्या काही दिवसांपासून ओली यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन स्थगित केल्यानंतर आता ओली एक अध्यादेश आणून पक्षच फोडतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पक्षांतर्गत अडचणी वाढल्यानं ओली आता थेट मुख्य विरोधी पक्ष असलेल्या नेपाळी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचं वृत्त इकॉनॉनिक टाईम्सनं दिलं आहे. सत्तेवर कायम राहण्यासाठी ओली यांनी अध्यादेश आणून राजकीय पक्षांशी असलेल्या कायद्यात बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. 

टॅग्स :NepalनेपाळAyodhyaअयोध्या