शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

नेपाळचा भारताला मदतीचा हात! चीन दौऱ्याआधी PM प्रचंड यांची घोषणा; ड्रॅगनला मोठा झटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2023 16:19 IST

नेपाळ-भारत व्यापारी संबंधांमुळे चीन नाराज असल्याची चर्चा

India Nepal Relations: नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल प्रचंड 23 सप्टेंबर रोजी चीनच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहेत. प्रचंड 7 दिवस चीनमध्ये राहणार असून यादरम्यान ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांना भेटणार आहेत. प्रचंड यांच्यासोबत त्यांची मुलगी गंगा आणि परराष्ट्र मंत्री एनपी सौद यांच्यासह अनेक ज्येष्ठ मंत्री चीनला जाणार आहेत. प्रचंड यांच्या चीन दौऱ्यापूर्वी भारत आणि नेपाळमध्ये वीजेबाबत मोठा करार झाला आहे. भारत आणि नेपाळच्या अधिकाऱ्यांनी दोन्ही देशांमधील वीज व्यापार वाढविण्यास सहमती दर्शवली असून त्यासाठी अनेक ट्रान्समिशन कॉरिडॉर उघडले जातील.काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, संयुक्त तांत्रिक समितीच्या 14 व्या बैठकीत ढलकेबार-मुझफ्फरपूर ट्रान्समिशन लाइनद्वारे विजेचा व्यापार वाढविण्यावर सहमती झाली. याशिवाय विद्युत व्यापाराला गती मिळावी यासाठी सीमापार विद्युत लाईनच्या बांधकामाला गती देण्याचे मान्य करण्यात आले आहे. या करारानुसार ढलकेबार-मुझफ्फरपूर ट्रान्समिशन लाइनद्वारे 800 मेगावॅट ते 1000 मेगावॅटपर्यंत वाढ करण्याचे मान्य करण्यात आले आहे.

दोन्ही देशांनी नौतरवा-मैनैया लाइन ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे मान्य केले आहे. त्याचा वापर वीज आयात आणि निर्यात करण्यासाठी केला जाऊ शकतो. भारतासोबतच्या या ताज्या कराराद्वारे नेपाळ विजेची निर्यात वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. नेपाळचे पंतप्रधान प्रचंड यांच्या नवी दिल्ली दौऱ्यात भारत सरकारने पुढील 10 वर्षांत नेपाळकडून 10,000 मेगावॅट वीज खरेदी करेल, असे आश्वासन दिले होते. नेपाळमधील चीनच्या राजदूताने अलीकडेच नेपाळच्या भारतासोबतच्या वाढत्या संबंधांवर नाराजी व्यक्त केली होती. चीनला भारत आणि नेपाळमधील मैत्री आवडत नाही आणि म्हणूनच तो देशाला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही तर नेपाळ आणि अमेरिका यांच्यातील एमसीसी करारावरही चीनचा आक्षेप असून जिनपिंग आणि प्रचंड यांच्यातील चर्चेत हा मुद्दा पुढे येऊ शकतो, असे मानले जात आहे.

टॅग्स :NepalनेपाळIndiaभारतchinaचीनelectricityवीज