नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह 6 जण ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2018 17:32 IST2018-09-08T17:32:25+5:302018-09-08T17:32:55+5:30

Nepal helicopter crashed; Six people, including pilot, killed | नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह 6 जण ठार

नेपाळमध्ये हेलिकॉप्टर कोसळले; पायलटसह 6 जण ठार

काठमांडू : नेपाळच्या गोरखा जिल्ह्याहून काठमांडूला जाणारे हेलिकॉप्टर आज दुर्घटनाग्रस्त झाले. यामध्ये जपानच्या एका पर्यटकासह सहा जण ठार झाले आहेत. तर एका महिलेला वाचविण्यात आले आहे. 


नुवाकोट जिल्ह्यातील सर्नचेत येथील घनदाट जंगलामध्ये हे हेलिकॉप्टर कोसळले. पायलटसह सहा जण ठार झाले आहेत. गोरखाहून रुग्णाला काठमांडूला आणण्यात येत असताना ही दुर्घटना घडली. 


नेपाळच्या पोलिसांनी सांगितले की, हेलिकॉप्टरचा रडारशी संपर्क तुटला होता. शेवटचा संपर्क नुवाकोट आणि धडिंग जिल्ह्याच्या सीमारेषेवर झाला होता. नेपाळच्या हवाई दलाने या हेलिकॉप्टरला सत्यवतीजवळ असल्याचे सांगितले. ही जागा घनदाट जंगलाने व्यापलेली आहे. तसेच 5500 फूट उंचीवर आहे. 
 

Web Title: Nepal helicopter crashed; Six people, including pilot, killed