नेपाळमध्ये जेन झी आंदोलनाच्या काही महिन्यांतच लागली निवडणूक, चार माजी पंतप्रधान रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 13:26 IST2026-01-22T13:25:13+5:302026-01-22T13:26:16+5:30

तीन महापौरही मैदानात

Nepal elections held within months of GenZ movement four former prime ministers in fray | नेपाळमध्ये जेन झी आंदोलनाच्या काही महिन्यांतच लागली निवडणूक, चार माजी पंतप्रधान रिंगणात

नेपाळमध्ये जेन झी आंदोलनाच्या काही महिन्यांतच लागली निवडणूक, चार माजी पंतप्रधान रिंगणात

काठमांडू : नेपाळमधील जेन झी आंदोलनाच्या काही महिन्यांनी पाच मार्च रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत चार माजी पंतप्रधानांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. नेपाळ कम्युनिस्ट पार्टी (युनायटेड मार्क्सवादी - लेनिनवादी)चे अध्यक्ष व पदच्युत पंतप्रधान के. पी. शर्मा ओली झापा-५ मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. नेपाळ कम्युनिस्ट पार्टी (माओवादी सेंटर)चे माजी पंतप्रधान पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ यांनी रुकुम पूर्व मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. इतर दोन माजी पंतप्रधान, नेपाळी कम्युनिस्ट पार्टीचे माधव कुमार नेपाल व प्रगतीशील लोकतांत्रिक पार्टीचे बाबुराम भट्टराई यांनी अनुक्रमे रौतहट-१ आणि गोरखा-२ मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

तीन महापौरही मैदानात

केवळ माजी पंतप्रधानच निवडणुकीच्या रिंगणात नाहीत, तर देशभरातील तीन महापौरांनीही निवडणुकीत आपले नशीब आजमावण्यासाठी आपापल्या पदांचा राजीनामा दिला आहे. यात काठमांडू महानगरपालिकेचे माजी महापौर बालेन्द्र शाह ‘बालेन’ हे प्रमुख आणि लोकप्रिय आहेत. त्यांनी पूर्व नेपाळमधील झापा-५ मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी आपल्या पदाचा राजीनामा दिला. धरानचे महापौर हरका संपंग हे सुनसरी-१मधून निवडणूक लढवत आहेत. प्रचंड यांची कन्या रेणू दाहाल या भरतपूरच्या महापौर होत्या. त्या चितवन-३ मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

Web Title : नेपाल चुनाव: जेन ज़ी आंदोलन के बाद चार पूर्व प्रधानमंत्री मैदान में

Web Summary : नेपाल के आगामी चुनावों में चार पूर्व प्रधानमंत्री सीटों के लिए प्रतिस्पर्धा कर रहे हैं। प्रमुख उम्मीदवारों में के.पी. शर्मा ओली, पुष्प कमल दहल 'प्रचंड', माधव कुमार नेपाल और बाबूराम भट्टराई शामिल हैं। काठमांडू के लोकप्रिय पूर्व महापौर बालेन्द्र शाह सहित तीन महापौरों ने भी चुनाव लड़ने के लिए इस्तीफा दे दिया।

Web Title : Nepal Elections: Four Former Prime Ministers Compete After Gen Z Protests

Web Summary : Nepal's upcoming elections feature four former prime ministers vying for seats. Key candidates include K.P. Sharma Oli, Pushpa Kamal Dahal 'Prachanda', Madhav Kumar Nepal, and Baburam Bhattarai. Three mayors also resigned to contest, including Kathmandu's popular former mayor, Balendra Shah.