Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 13:52 IST2025-09-11T13:51:49+5:302025-09-11T13:52:56+5:30
Nepal Crisis : २०२० मध्ये केपी शर्मा ओली नेपाळचे पंतप्रधान होते. त्यानंतर त्यांनी भगवान राम हे भारतीय नसून नेपाळी होते असे वादग्रस्त विधान केले होते.

Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
Nepal Crisis : मागील काही दिवसांपासून नेपाळमध्ये सोशल मिडिया बंदी विरोधात निदर्शने सुरू आहेत. या निदर्शनांने हिंसक वळण घेतले आहे, मंत्र्यांची घर जाळण्यात आली असून संसदही जाळली आहे. आता तुरुंगातून कैदीही पळून जात आहेत. नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा दिल्यानंतर ओली यांनी पहिले विधान केले. त्यांनी भारताविरोधात केलेल्या विधानामुळे सत्ता सोडावी असा दावा त्यांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केपी शर्मा ओली यांनी त्यांच्याच पक्षाच्या सरचिटणीसांना एक पत्र पाठवले, या पत्रात त्यांनी भारताविरुद्ध विधान केले. ओली म्हणाले की, जर त्यांनी लिपुलेखवर प्रश्न उपस्थित केले नसते तर ते पदावर राहिले असते. ओली म्हणाले की, मी संवेदनशील मुद्द्यांवर भारताला आव्हान देण्याचे धाडस दाखवले आहे आणि हे त्याचेच परिणाम आहेत.
ओली यांनी अयोध्येचा उल्लेख केला
ओली यांनी अयोध्या आणि भगवान राम यांच्यावरील त्यांच्या भूमिकेसाठी त्यांना राजकीय किंमत मोजावी लागली असे म्हटले आहे. 'अयोध्येत राम जन्माला विरोध केल्यामुळे मी माझी सत्ता गमावली, असंही ओली म्हणाले. ते सध्या नेपाळी सैन्याच्या संरक्षणाखाली शिवपुरी बॅरेकमध्ये राहत आहेत.
२०२० मधील विधान काय?
२०२० मध्ये केपी शर्मा ओली नेपाळचे पंतप्रधान होते. यावेळी त्यांनी वादग्रस्त विधान केले होते. 'भगवान राम हे भारतीय नव्हते तर नेपाळी होते', असं विधान त्यांनी केले होते. भगवान रामाचे राज्य अयोध्या नेपाळमधील बीरगंजच्या पश्चिमेस आहे, असंही ते म्हणाले होते.
केपी शर्मा ओली हे देखील लिपुलेख हा नेपाळचा असल्याचा दावा करत आहेत. लिपुलेख खिंड वाद हा भारत आणि नेपाळमधील सीमा वादांपैकी एक आहे. हा खिंड कालापानीभोवती फिरतो आणि काली नदीच्या उगमस्थानावरून दोन्ही देशांमध्ये मतभेद आहेत. नेपाळ म्हणत आहे की ही नदी लिपुलेखच्या वायव्येकडील लिपियाधुरा येथून उगम पावते, यामुळे कलापाणी आणि लिपुलेख त्यांच्या भूभागाचा भाग आहेत. याबाबत भारताची भूमिका स्पष्ट आहे. ही नदी कलापाणी गावाजवळून सुरू होते, यामुळे हा भाग उत्तराखंडचा भाग असल्याचे भारताने सांगितले आहे.