शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 12:48 IST

नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांनी चीन किंवा दुबईची शरण घेतली असावी, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, आता ते नेमके कुठे लपून बसले आहेत, याची माहिती समोर आली आहे.

नेपाळमधील 'जेन झी' आंदोलन आता काहीस थंड झालं असलं, तरी अजून तणाव पूर्णपणे निवळलेला नाही. या आंदोलनामुळे देशात सत्तापालट झाली आहे. या आंदोलनाची तीव्रता इतकी होती की, संपूर्ण मंत्रीमंडळाला राजीनामा द्यावा लागला. इतकंच काय तर, नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यावर देश सोडून पळून जाण्याची वेळ आली. गेल्या २ दिवसांपासून अनेक मंत्र्यांना 'जेन-झी' आंदोलनकर्त्यांचा मारही खावा लागला. मात्र, या दरम्यान पंतप्रधान कुठेच दिसले नाहीत. नेपाळचे पंतप्रधान देश सोडून पळून गेले, असा कयास लोकांनी बांधला होता. मात्र, ते नेमके कुठे गेले याची माहिती कुणालाच नाही. माजी पंतप्रधान ओली यांनी चीन किंवा दुबईची शरण घेतली असावी, असा अंदाज बांधला जात होता. मात्र, आता ते नेमके कुठे लपून बसले आहेत, याची माहिती समोर आली आहे. स्वत: केपी शर्मा ओली यांनी सोशल मीडियावर एक पत्र शेअर केले आहे. यात त्यांनी सगळ्या चर्चांना स्वतः पूर्ण विराम देत आपण आता कुठे आहोत, हे सांगितले आहे. 

कुठे आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान?नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली हे चीन किंवा दुबई नाही तर नेपाळमध्ये थांबले आहेत. नेपाळच्या शिवपुरी भागात कडक सुरक्षेत त्यांनी आश्रय घेतला आहे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नेपाळी सेनेने घेतली आहे. केपी शर्मा ओली यांनी शेअर केलेल्या पत्रात तरुणांना आवाहन केले आहे. यात त्यांनी म्हटले की, सध्या ते सैनिकांच्या सुरक्षेत असून, या सगळ्या हल्लाकल्लोळात देखील त्यांना देशातील तरुणांची आणि लहान मुलांची आठवण येत असल्याचे म्हटले आहे. त्यांनी म्हटले की, लहान बाळांचं हसू आणि तरुणांचा स्नेह मला रोमांचित करत राहील. 

काय म्हणाले केपी शर्मा ओली?

या आंदोलनाबद्दल आपलं मत मांडताना मनातील वेदना देखील व्यक्त केल्या आहेत. त्यांनी आपल्या पत्रात म्हटले की, देश सांभाळताना परिवर्तनाच्या लढाईत मी स्वतः अपत्य सुखापासून वंचित राहिलो. मात्र, बाबा बनण्याची माझी ओढ कधीच कमी झाली नाही. यावेळी त्यांनी लोकांना याचीही आठवण करून दिली, जेव्हा ते नेपाळ गृहमंत्री होते, त्या काळात देशात एकही गोळी चालली नव्हती. 

सध्या देशात सुरू असलेले 'जेन-झी' आंदोलन हा तरुणांचा खरा आवाज नसून, ते मोठं षडयंत्र असल्याचे, त्यांनी म्हटले आहे. सरकारी कार्यालयांमध्ये आग लावणे, तुरुंगातून कैद्यांना मुक्त करणे, हे एखाद्या आनंदोलनाचा भाग असूच शकत नाही. जी लोकशाही व्यवस्था संघर्ष आणि बलिदान देऊन मिळवली आहे, आज तीच व्यवस्था संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे, त्यांनी म्हटले.   

टॅग्स :Nepalनेपाळagitationआंदोलन