शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
2
स्कुबा डायव्हिंग करताना ५२ वर्षीय प्रसिद्ध गायकाचा मृत्यू, चाहत्यांना मोठा धक्का
3
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
4
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
5
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
6
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
7
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
8
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
9
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
10
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
11
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
12
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
13
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
14
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
15
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
16
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
17
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल
18
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
19
"मोदी-फडणवीसांच्या आईवर बोलले गेले, तेव्हा शरद पवारांनी फोन केला नाही, मी माफी कशासाठी मागू"
20
सरकारी नोकरी मिळवण्याचा गोल्डन चान्स; इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये भरती

पेटलेल्या ट्रॅक्टरमधून ड्रायव्हरला ओढताना...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2023 10:19 IST

अमेरिकेतील इंटरस्टेट हायवेजवर वेगमर्यादाही बऱ्यापैकी जास्त असते.

अमेरिकेच्या नॉर्थ कॅरोलिना राज्यातील पोलिस नेहमीसारखे हायवेवर गस्त घालत होते आणि अचानक भरधाव वेगाने येणारा एक ट्रॅक्टर आणि त्याला जोडलेला ट्रेलर काही कळायच्या आत हायवेच्या कठड्यावर आदळले आणि त्यांनी पेट घेतला. इंटरस्टेट ८५ हा अमेरिकेतील एक मोठा महामार्ग आहे. अमेरिकेतील बहुतेक सगळे ५ या आकड्याने संपणारे हायवे देशाच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाकडे जाणारे प्रचंड लांबीचे असतात. त्यामानाने इंटरस्टेट ८५ हा हायवे कमी लांबीचा आहे. पण, कमी लांबीचा असला, तरी तो इंटरस्टेट, म्हणजेच एकाहून अधिक राज्यांना जोडणारा रस्ता असल्याने त्यावर अर्थातच खूप जास्त रहदारी असते. अमेरिकेतील इंटरस्टेट हायवेजवर वेगमर्यादाही बऱ्यापैकी जास्त असते.

या महामार्गावरही अनेक ठिकाणी ताशी ६५ ते ७० मैल म्हणजेच १०५ ते ११३ किलोमीटर्स इतकी वेगमर्यादा आहे. महामार्गावर गाडी चालविण्याचे अनेक नियम असतात, ते कसोशीने पाळले जातात हेही खरं आहे. मात्र, तरीही… इतक्या प्रचंड वेगात असलेल्या गाडीचा जेव्हा अपघात होतो, त्यावेळी त्याचे परिणाम फार भयंकर असतात. त्यातही जर का अपघात झालेली गाडी आकाराने मोठी असेल तर हे परिणाम अजूनच वाईट असतात. या ताज्या अपघातात नेमकं हेच झालं होतं. ट्रॅक्टर आणि त्याला जोडलेला ट्रेलर घेऊन मायकल विल्यम्स  या महामार्गावरून भरधाव वेगाने चालला होता. त्यात त्याचं ट्रॅक्टरवरचं नियंत्रण सुटलं, ट्रॅक्टर आणि ट्रेलर महामार्गाच्या कठड्यावर आदळले आणि काही कळायच्या आत ट्रॅक्टरने पेट घेतला.

हा अपघात घडला त्यावेळी लेफ्टनंट ब्रूक्स हा पोलिस अधिकारी तिथेच होता. त्याने तो अपघात होताना बघितला आणि गाडीने पेट घेतलेलाही बघितला. त्यावेळी त्या ट्रॅक्टरमधून इंधन बाहेर सांडलेलं होतं. त्या रस्त्यावर सांडलेल्या इंधनानेही पेट घेतलेला होता. कुठल्याही क्षणी त्या सगळ्याच वाहनाचा स्फोट झाला असता. पण, असं असलं तरीही त्यातील चालक मात्र अजूनही बाहेर आलेला नव्हता. हे लक्षात आल्यावर ब्रूक्ससारखा कर्तव्यदक्ष अधिकारी तिथून तसाच निघून जाणं शक्यच नव्हतं. पण, त्या पेटलेल्या ट्रॅक्टरच्या जवळ जाणं म्हणजे साक्षात मृत्यूच्या दारात पाऊल ठेवणं होतं. ब्रूक्स म्हणतो, “तो ट्रक बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की, याचा कुठल्याही क्षणी स्फोट होऊ शकतो आणि माझ्या मनात आलं, ‘मी एकतर त्यातल्या चालकासोबत इथे मरणार आहे किंवा मी त्याला इथून बाहेर काढणार आहे.’ तो कठड्यावर आदळला त्यावेळी मला भीती वाटली. कारण इतक्या वेगाने असा कठड्यावर आपटणारा ट्रॅक्टर आणि त्याचा ट्रेलर काही तुम्हाला रोज बघायला मिळत नाही.” पण स्वतःचा जीव वाचवून त्या गाडीपासून लांब निघून जावं, असं काही ब्रूक्सच्या मनात आलं नाही.

ब्रूक्स त्या जळत्या ट्रकच्या जवळ गेला आणि त्याने ओरडून त्यातल्या चालकाला हाका मारायला सुरुवात केली. चालकाने काहीच प्रतिसाद दिला नाही, तेव्हा ब्रूक्सच्या लक्षात आलं, की आतला चालक सीटबेल्ट लावून बेशुद्ध पडलेला आहे. त्यानंतर लेफ्टनंट ब्रूक्स हा पोलिस अधिकारी या जळत्या ट्रकमध्ये चढला आणि बेशुद्ध पडलेल्या मायकेल विल्यम्सला बाहेर काढण्याची खटपट करायला लागला. अमेरिकेतील पोलिसांना बहुतेक वेळा ‘बॉडी कॅम’ म्हणजे शरीरावर लावून ठेवण्याचा कॅमेरा दिलेला असतो. ब्रूक्सच्या अंगावरील ‘बॉडी कॅम’मध्ये ही संपूर्ण घटना चित्रित झालेली आहे.

जळत्या ट्रकमधून बेशुद्ध पडलेल्या चालकाला सीटबेल्ट सोडवून बाहेर काढायचं आणि ट्रकपासून दूर घेऊन जायचं हे काम एकट्या माणसाला करणं जवळजवळ अशक्य आहे. ब्रूकने एकट्याने ते कसं काय केलं असतं, हे एक कोडंच आहे. पण ब्रूक्सच्याच शब्दात सांगायचं तर त्यावेळी त्याच्या मदतीला दुसऱ्या एका गाडीचा चालक गाडी थांबवून देवदूतासारखा धावून आला. त्याने अर्जेंटिनाच्या फुटबॉल टीमचा टीशर्ट घातला होता. त्याने ब्रूक्सला मायकेल विल्यम्सला जळत्या ट्रकमधून काढून रस्ता ओलांडून जळत्या ट्रकपासून दूर उचलून न्यायला मदत केली. हा माणूस कोण होता ते समजलं नाही. पण, त्याने केलेल्या मदतीने केवळ विल्यम्सचाच नव्हे तर ब्रूक्सचाही जीव वाचवला, यात शंका नाही. कारण ब्रूक्सच्या बॉडी कॅममध्ये जे चित्रण झालं आहे, त्यात ब्रूक्स, विल्यम्स आणि तो तिसरा मनुष्य ट्रकपासून लांब गेल्यानंतर मोठा स्फोट झाल्याचा आवाज ऐकू येतो.

थँक यू, लेफ्टनंट ब्रुक्स !नॉर्थ कॅरोलिना राज्यातील सॅलिसबरी पोलिस डिपार्टमेंटने लेफ्टनंट ब्रूक्सच्या कामाची दखल घेऊन त्याचा सत्कार केला आहे. याआधीदेखील लेफ्टनंट ब्रूक्सला सिटी ऑफ सॅलिसबरी ब्रॉन्झ कीज ऑफ एक्सलन्स, सॅलिसबरी पोलिस व्हेटरन ऑफिसर ऑफ द इयर, ब्लू लाईन ब्रदरहूड अवॉर्ड २०१६ आणि लायन्स क्लब सॅलिसबरी पोलिस व्हेटरन ऑफ द इयर हे सन्मान मिळालेले आहेत.

टॅग्स :Americaअमेरिका