नवाज शरीफ यांच्या दोन पुतण्यांना विमानातून उतरवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2019 04:14 IST2019-08-03T04:14:19+5:302019-08-03T04:14:22+5:30

अब्बास आणि अब्दुल अजित अब्बास यांना हज यात्रेला

Nawaz Sharif's two nephews got off the plane | नवाज शरीफ यांच्या दोन पुतण्यांना विमानातून उतरवले

नवाज शरीफ यांच्या दोन पुतण्यांना विमानातून उतरवले

लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे दोन पुतणे युसूफ अब्बास आणि अब्दुल अजित अब्बास यांना हज यात्रेला जाणाऱ्या विमानातून उतरविण्यात आले. देश सोडून जाऊ नये, अशा व्यक्तींच्या यादीत त्यांची नावे असल्याने त्यांना रोखण्यात आले, असे चौकशी संस्थेच्या अधिकाºयाने सांगितले. दोन्ही बंधू चौधरी साखर कारखान्याचे भागधारक आहेत.

गुंतवणूक आणि वित्तीय लाभाबाबत त्यांनी चौकशीदरम्यान माहिती दिली नाही. दोघांवर मनीलाँड्रिंग, मिळकतीपेक्षा अधिक संपत्ती असल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याबाबत तपास संस्थेचे अधिकारी अधिक तपास करीत आहेत. 

Web Title: Nawaz Sharif's two nephews got off the plane