शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

नवाझ शरीफ ज्या विमानाने परतले, त्याच विमानात चोरी, हाणामारी;व्हिडिओ आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 08:26 IST

शरीफ दुबईहून ‘उमीद-ए-पाकिस्तान’ या चार्टर्ड विमानाने दुपारी इस्लामाबादला आले.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ ब्रिटनमधील चार वर्षांच्या विजनवासानंतर शनिवारी विशेष विमानाने मायदेशी परतले. आगामी सार्वत्रिक निवडणुकांत आपल्या पक्षाचे नेतृत्व करून विक्रमी चौथ्यांदा विजय मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. पाकमध्ये जानेवारीत निवडणूक होणार आहे. मात्र, शरीफ ज्या विमानानेपाकिस्तानात परतले, त्याच विमानात गोंधळ झाल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. 

शरीफ दुबईहून ‘उमीद-ए-पाकिस्तान’ या चार्टर्ड विमानाने दुपारी इस्लामाबादला आले. याच विमानात पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचे समर्थकही होते. त्यांनी खान साहब झिंदाबाद अशी घोषणाबाजी विमानात केली. तर, या विमानातील काही लोकांचं सामानही चोरी झाल्याचं उघडकीस आलं. विशेष म्हणजे सामान चोरी झाल्याचे समजताच विमानात तपासणी सुरू झाली. त्यावेळी, गोंधळ निर्माण होऊन काही जणांमध्ये हाणामारीही झाल्याचं समोर आलं आहे. विमानातील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.  या विमानात शरीफ यांच्या पक्षाचे नेते पीएमएल-एन (पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज) पक्षाचे नेते मलिक नूर अवान यांचं सामान हरवल्याचे समोर आले. त्यामुळे, प्रवाशांमध्ये हाणामारी सुरू झाली होती. दरम्यान, पाकिस्तानमध्ये येताच न्यायालयाने मंजूर केलेल्या जामीन प्रक्रियेचा भाग म्हणून उच्च न्यायालयात सादर करावयाच्या काही कायदेशीर कागदपत्रांवर विधी पथकाने त्यांची स्वाक्षरीही घेतली.

विमानतळावर म्हणाले, आज मी आनंदी

दुबई विमानतळावर पत्रकारांशी बोलताना शरीफ यांनी पाकमधील ‘अत्यंत अराजक’ परिस्थितीबद्दल दु:ख व्यक्त केले व संकटातून देशाला बाहेर काढण्यासाठी आपला पक्ष सक्षम असल्याचे सांगितले. शरीफ म्हणाले, ‘जेव्हा मी पाकिस्तान सोडून परदेशात जात होतो तेव्हा मनात आनंदाची भावना नव्हती; पण आज मी आनंदी आहे. २०१७ नंतर देशाची परिस्थिती बिघडत गेली. तेव्हा आम्ही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा निरोप घेतला होता, वीज स्वस्त होती. गरीब कुटुंबातील मुलगा शाळेत जात होता आणि औषधेदेखील स्वस्त होती. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAirportविमानतळairplaneविमान