इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 12:29 IST2026-04-06T12:28:44+5:302026-04-06T12:29:56+5:30
Ex-CIA Larry Johnson Claim: अमेरिकेने नतांज अणू प्रकल्पावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा दावा लॅरी जॉन्सन यांनी केला आहे. इराणने एकाच दिवसात ४०० दशलक्ष डॉलर्सची अमेरिकन विमाने कशी नष्ट केली?

इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
इराणमध्ये घुसून आपल्या वैमानिकाला वाचवल्याबद्दल ट्रम्प सरकारचे कौतुक होत असतानाच, अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेचे माजी अधिकारी लॅरी जॉन्सन यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. "पेंटागन जगाला खोटे सांगत आहे, अमेरिकेचे 'रेस्क्यू मिशन' हे मोठे अपयश असून एकाच दिवसात इराणने अमेरिकेची १० विमाने पाडली आहेत," असा दावा जॉन्सन यांनी केला आहे.
नतांज अणू प्रकल्पावर हल्ल्याचा कट?
लॅरी जॉन्सन यांच्या मते, पाडलेले F-15 फायटर जेट कोणत्याही साध्या गस्तीवर नव्हते, तर ते इराणच्या नतांज या अतिसंवेदनशील अण्वस्त्र प्रकल्पावर 'ग्राउंड अटॅक' करण्याच्या तयारीत होते. इराणने हे विमान वेळीच ओळखून आकाशातच उडवले. या घटनेनंतर अमेरिकेची खरी अडचण सुरू झाली.
एका दिवसात ४०० मिलियन डॉलर्सचा धूर!
जॉन्सन यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने केवळ एका वैमानिकाला वाचवण्याच्या नादात आलेल्या अमेरिकन ताफ्याचा चक्काचूर केला आहे. यात खालील विमानांचा समावेश असल्याचा दावा त्यांनी केला आहे:
F-15 फायटर जेट - १
२ ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर्स - २
C-130 ट्रान्सपोर्ट विमाने - २
लिटिल बर्ड्स (लहान हेलिकॉप्टर्स) - ४
A-10 वॉरथॉग विमान - १
एकाच दिवसात सुमारे ४०० मिलियन डॉलर्स (३३०० कोटी रुपयांहून अधिक) किमतीची अमेरिकन युद्धसामग्री इराणने नष्ट केली आहे.
Absolute humiliation for the US military. Former CIA Officer Larry Johnson reveals Iran shot down an F-15, two Blackhawks, two C-130s, four Little Birds, and an A-10 Warthog in a single day. 400 million dollars of US aircraft completely obliterated! pic.twitter.com/JNMmZk17ZN
— Furkan Gözükara (@FurkanGozukara) April 5, 2026
'रेस्क्यू मिशन' की मोठी आपत्ती?
जॉन्सन यांनी तांत्रिक प्रश्न उपस्थित करत विचारले की, जर कुवेत ते इस्फहान हे अंतर २५० मैल असेल आणि विशेष दलांची रेंज ३०० मैल असेल, तर ही विमाने परत कशी जाणार होती? त्यांच्या मते, C-130 विमाने इंधनासाठी आली होती आणि संपूर्ण ऑपरेशन वाळवंटात अडकल्यामुळे फसले.
वॉर सेक्रेटरी पीट हेगसेथ यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव
लष्करी अपयशानंतर अमेरिकन संसदेत रणकंदन माजले आहे. रिपब्लिकन नेते कारबजल यांनी संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांना चक्क "देशासाठीची लाज" म्हटले आहे. लष्करी प्रमुखांना पदावरून हटवल्यामुळे आणि इराण युद्धात झालेल्या नुकसानीमुळे हेगसेथ आता "अनफिट" असल्याचे आरोप होत आहेत.