शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नासाने घेतली सूर्याकडे झेप! ताशी ७ लाख किमी वेगाने करणार प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2018 06:46 IST

सूर्याच्या ‘कॉरोना’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतितप्त व अत्यंत अस्थिर अशा बाह्य वातावरणाचा जवळून अभ्यास करण्यासाठी अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने ‘पार्कर सोलर प्रोब’ या मानवरहीत यानाचे रविवारी केप कॅनेव्हेरल अंतराळ तळावरून यशस्वी प्रक्षेपण केले.

केप कॅनेव्हेरल (अमेरिका) : सूर्याच्या ‘कॉरोना’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अतितप्त व अत्यंत अस्थिर अशा बाह्य वातावरणाचा जवळून अभ्यास करण्यासाठी अमेरिकेच्या ‘नासा’ या अंतराळ संशोधन संस्थेने ‘पार्कर सोलर प्रोब’ या मानवरहीत यानाचे रविवारी केप कॅनेव्हेरल अंतराळ तळावरून यशस्वी प्रक्षेपण केले.युनायटेड लॉन्च अ‍ॅलायन्स या खासगी कंपनीने तयार केलेल्या ‘डेल्टा-४’ या अतिशक्तिशाली रॉकेटने या ‘सोलर प्रोब’ला कवेत घेऊन ठरल्या वेळी अचूक उड्डाण केले. शनिवारी ऐेन वेळी काही त्रुटी लक्षात आल्याने उड्डाण लांबणीवर टाकले होते. ताशी सुमारे सात लाख किमी अशा वेगाने प्रवास करत हे रॉकेट ‘पार्कर सोलर प्रोब’ला सूर्याच्या पृष्ठभागापासून ६.१६ दशलक्ष किमी अंतरावर वातावरणात नेऊन सोडेल. आजवर माणसाने पाठविलेली कोणताही वस्तू सूर्याच्या एवढ्या जवळ जाण्याची ही पहिलीच वेळ असेल.हे ‘सोलर प्रोब’ सूर्याच्या बाह्य वातावरणात पोहोचल्यावर पुढील सात वर्षे तेथे राहील. या काळात ते सूर्याच्या अधिकाधिक जवळ जात या ताºयाच्या सात प्रदक्षिणा करेल. अशी पहिली चक्कर येत्या नोव्हेंबरमध्ये अपेक्षित आहे. या संपूर्ण मोहिमेवर १.५ अब्ज डॉलर खर्च अपेक्षित आहे. ‘नासा’च्या ‘लिव्हिंग विथ ए स्टार’ कार्यक्रमातील ही पहिलीच मोठी मोहीम.ही ‘हनुमान उडी’ कशासाठी?सूर्यावर एकसारखे महाप्रचंड स्फोट होतात. त्यातून अतिभारित चुंबकीय कणांची वादळे उठतात व ती संपूर्ण ग्रहमालेत पसरून पृथ्वीवरही पोहोचतात, असे मानले जाते. याचा परिणाम म्हणून पृथ्वीवरील दळणवळण साधने बंद पडतात व उष्णतेची लाट येते. ‘पार्कर सोलर प्रोब’ हे सर्व कसे, कशामुळे व किती कालावधीने होते याची वैज्ञानिक माहिती गोळा करेल.सूर्य म्हणजे नेमके काय आहे व तेथे कशा रासायनिक व आण्विक प्रक्रिया सुरू असतात, याचे अधिक सखोल ज्ञान यामुळे उपलब्ध होईल. सर्व चराचर सृष्टीचा सूर्य हाच तारणहार असल्याने त्याची अधिक खात्रीलायक ओळख होणे पृथ्वीवासीयांसाठी उपकारक असेल.डॉ. पार्कर यांना मिळाला हा विरळा बहुमानडॉ. युजेन न्यूमन पार्कर या थोर अमेरिकी सौरभौतिकी वैज्ञानिकाचे नाव या ‘सोलर प्रबोब’ला देण्यात आले आहे. वैज्ञानिकाच्या हयातीत त्याचे नाव ‘नासा’च्या एखाद्या मोहिमेस दिले जाण्याची ही पहिलीच वेळ. १९८३ मध्ये विल्यम ए. फाउलर यांच्यासोबत पदार्थ विज्ञानाचा ‘नोबेल’ पुरस्कार मिळालेल्या डॉ. चंद्रशेखर यांचाही ‘नासा’ने त्यांच्या क्ष-किरण वेधशाळेस ‘चंद्रा एक्स-रे आॅब्झर्व्हेटरी’ असे नाव देऊन मरणोत्तर गौरव केला आहे.1972मध्ये ‘हेलियॉस-२’ यानाने ४३ दशलक्ष किमी एवढ्या अंतरावरून सूर्याच्या वातावरणाचा अभ्यास केला होता. म्हणूनच या मोहिमेला ‘सूर्याला स्पर्श करणारी मोहीम’ म्हटले गेले आहे. पृथ्वीपासून सूर्याचे अंतर १५० दशलक्ष किमी आहे.मोटारीच्या आकाराचे हे ‘सोलर प्रोब’ तीन मीटर लांबीचे व685किलो वजनाचे आहे. 

टॅग्स :NASAनासाnewsबातम्या