मंगळावर अंतरिक्षयान उतरतानाचा व्हिडिओ नासाने केला जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 01:12 IST2021-02-24T01:12:22+5:302021-02-24T01:12:28+5:30
१८ फेब्रुवारी रोजी पर्सेव्हरन्स रोव्हर अतिसूक्ष्म जीवसृष्टीची काही चिन्हे शोधण्यासाठी जेझेरो क्रेटरमधील नदीपात्रात उतरले.

मंगळावर अंतरिक्षयान उतरतानाचा व्हिडिओ नासाने केला जारी
केप कानाव्हेराल : मंगळ ग्रहावर अंतरिक्षयान उतरताना तीन मिनिटांचा उच्च दर्जाचा व्हिडिओ अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने सोमवारी जारी केला. रॉकेट इंजिनने रोव्हरला पृष्ठभागावर आणले तेव्हा नारंगी आणि पांढऱ्या रंगाचा पॅराशूट खूप वेगात उघडताना आणि लाल धूळ उडताना दिसली. रोव्हर टीमच्या सदस्यांनी म्हटले की, आम्ही जणू त्यासोबत सैर करीत आहोत, असेच वाटले.
१८ फेब्रुवारी रोजी पर्सेव्हरन्स रोव्हर अतिसूक्ष्म जीवसृष्टीची काही चिन्हे शोधण्यासाठी जेझेरो क्रेटरमधील नदीपात्रात उतरले. पॅसाडेनातील (कॅलिफोर्निया) जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीत असलेल्या या टीमने आठवडाभर निरीक्षणाचा त्याचा आनंद घेऊन व्हिडीओ पत्रकार परिषदेत जारी केला.