पहिल्यांदाच! मंगळ ग्रहावरून NASA च्या रोवरने पाठवला पहिला व्हिडीओ, बघा लाल ग्रहाचा अद्भूत नजारा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 15:24 IST2021-02-23T15:23:13+5:302021-02-23T15:24:44+5:30
NASA perseverance rover landing video : चार दिवसांआधी १९ फेब्रुवारीला मार्स मिशन (Mars Mission NASA) च्या अंतर्गत नासाचं पर्सीवरेंस रोवन (Perseverance Rover) पृथ्वीवरून टेकऑफ केल्यानंतर सात महिन्यांनी यशस्वीपणे मंगळ ग्रहावर लॅंड झालं होतं.

पहिल्यांदाच! मंगळ ग्रहावरून NASA च्या रोवरने पाठवला पहिला व्हिडीओ, बघा लाल ग्रहाचा अद्भूत नजारा...
NASA perseverance rover landing video : अमेरिकन अंतराळ संस्था NASA ने मंगळ ग्रहावरील (Mars) चे ताज्या फुटेजचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ नुकताच मंगळावर गेलेल्या नासाच्या पर्सीवरेंस रोवर (Perseverance Rover) ने मंगळावरून पाठवला आहे. या व्हिडीओत पर्सीवरेंस रोवरने पॅराशूटच्या मदतीने मंगळ ग्रहावरील लाल जमिनीवर लॅंड करण्याच्या (NASA Mars Perseverance Rover Landing Video) च्या एका एका क्षणाला कॅमेरात कैद केलं आहे.
नासाचं मिशन मंगळ
चार दिवसांआधी १९ फेब्रुवारीला मार्स मिशन (Mars Mission NASA) च्या अंतर्गत नासाचं पर्सीवरेंस रोवन (Perseverance Rover) पृथ्वीवरून टेकऑफ केल्यानंतर सात महिन्यांनी यशस्वीपणे मंगळ ग्रहावर लॅंड झालं होतं. जगभरातील वैज्ञानिकांचं लक्ष या लॅंडींगवर होतं. हा रोवर लाल ग्रहाच्या सर्वात धोकादायक क्षेत्रात जजेरो क्रेटरमध्ये उतरलं होतं. आता रोवरने मंगळ ग्रहाचा एक व्हिडीओ पाठवला आहे. ज्यात मंगळावरील पहिल्यांदाच हाय डेफिनेशन आवाज ऐकायला मिळत आहे.
२५ कॅमेरे असलेल्या पर्सीवरेंस रोवनने वेगवेगळ्या अॅंगलने मंगळावरील लाल जमिनीला कॅमेरात कैद केलंय. मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागाचा इतका जवळील व्हिडीओ पहिल्यांदाच समोर आला आहे. व्हिडीओ बघितल्यावर समजतं की, मंगळ ग्रहावरील जमीन ओबडधाबड आहे. जमिनीवर मोठमोठे खड्डे आहेत.
वाळवंटासारखा दिसतोय लाल ग्रह
मंगळ ग्रहाचा हा व्हिडीओ पाहून असं वाटतंय की जणू हा एखादा वाळवंट आहे. व्हिडीओत दिसतं की, जसजसा रोवर मंगळ ग्रहाच्या पृष्ठभागावर जातो, त्याच्या जेटने फेकल्या जात असलेल्या हवेमुळे जमिनीवरील माती हवेत उडत आहे. रोवर जमिनीपासून २० मीटर अंतरावर असतानाचा व्हिडीओ आहे. जमिनीवर पोहोचताच रोवरचे आठही चाके खुलू लागतात आणि काही सेकंदात रोवर मंगळ ग्रहावर लॅंड होतं.
मंगळ ग्रहावर जीवनाची शक्यता
दरम्यान पर्सीवरेंस रोवर मंगळ ग्रहावर कार्बनडायऑक्साइडपासून ऑक्सीजन बनवण्याचं काम करेल आणि मंगळ ग्रहावर पाण्याा शोध घेईल. सोबतच मंगळ ग्रहाच्या जमिनीखाली जीवनाचे पुरावे शोधेल. त्यासोबत मंगळ ग्रहावरील वातावरण आणि जलवायुचा अभ्यास करेल.