नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2025 06:34 IST2025-11-08T06:34:03+5:302025-11-08T06:34:40+5:30
पुढील वर्षी भारत क्वॉड देशांची शिखर परिषद आयोजित करत आहे

नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
न्यूयॉर्क/ वॉशिंग्टन : पुढील वर्षी आपण कदाचित भारतदौऱ्यावर जाणार असल्याचे विधान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी ओव्हल ऑफिसमध्ये केले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महान व्यक्ती व आपले मित्र असून मी भारताला भेट द्यावी, अशी त्यांची इच्छा असल्याचे ट्रम्प म्हणाले. भारतभेटीबाबत दोघे ठरवू. मला जायचे आहे. ती भेट एक उत्तम अनुभव असेल, असे ट्रम्प म्हणाले.
पुढील वर्षी भारत क्वॉड देशांची शिखर परिषद आयोजित करत आहे. या परिषदेला ऑस्ट्रेलिया, जपान, अमेरिकेचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. या परिषदेची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. दरम्यान अन्य एका प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प यांनी भारताने रशियाकडून बहुतेक तेलखरेदी थांबवली असल्याचे म्हटले.