चिंता वाढली! 'या' देशात वेगाने पसरतोय रहस्यमयी व्हायरस; खोकताना येतं रक्त, 'ही' आहेत लक्षणं

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 12:50 IST2025-04-03T12:50:13+5:302025-04-03T12:50:53+5:30

जगभरात विविध प्रकारच्या व्हायरसचा प्रसार होत असल्याचं सतत समोर येत राहतात, यामधील अनेक व्हायरस हे प्राणघातक देखील असतात.

mystery virus outbreak in russia leaves sufferers coughing up blood | चिंता वाढली! 'या' देशात वेगाने पसरतोय रहस्यमयी व्हायरस; खोकताना येतं रक्त, 'ही' आहेत लक्षणं

चिंता वाढली! 'या' देशात वेगाने पसरतोय रहस्यमयी व्हायरस; खोकताना येतं रक्त, 'ही' आहेत लक्षणं

भारतातच नाही तर जगभरात विविध प्रकारच्या व्हायरसचा प्रसार होत असल्याचं सतत समोर येत राहतात, यामधील अनेक व्हायरस हे प्राणघातक देखील असतात.  रशियामध्ये एका रहस्यमयी व्हायरसचा वेगाने प्रसार होत असल्यामुळे लोक खूप चिंतेत आहेत. या व्हायरसची लागण झालेल्या लोकांना खूप जास्त ताप आणि खोकल्यावर रक्त येत आहे असं म्हटलं जातं. लोकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

रहस्यमयी व्हायरसने संक्रमित झालेल्या रुग्णांची कोरोना आणि फ्लूची टेस्ट घेण्यात आली. मात्र ते निगेटिव्ह आले आहेत. म्हणूनच आता लोकांना नेमका कोणत्या व्हायरसचा त्रास होत आहे हे गूढ राहिलं आहे. व्हायरसवर उपचार करण्यासाठी अँटीबायोटिक्सचा वापर केला जात आहे, परंतु त्याचा रुग्णांवर कोणताही परिणाम होत नसल्याचं दिसून येत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांवर उपचार करणं खूपच गुंतागुंतीचं झालं आहे.

रशियामध्ये पसरणाऱ्या या व्हायरसची ओळख पटवणं खूप कठीण होत चाललं आहे, कारण त्यावर कोणतंही अँटीबायोटिक्स काम करत नाहीत आणि फ्लू, कोरोना किंवा इतर टेस्ट पॉझिटिव्ह येत नाहीत. त्याचबरोबर रुग्णांच्या संख्येत सतत वाढ दिसून येत आहे. अशा परिस्थितीत, डॉक्टर लोकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देत आहेत जेणेकरून ते या व्हायरसपासून सुरक्षित राहू शकतील.

'ही' आहेत लक्षणं

या व्हायरसने ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये दिसणारी सुरुवातीची लक्षणं फ्लूसारखी असतात, जी हळूहळू वाढू लागतात. त्याची काही लक्षणं खालीलप्रमाणे आहेत-

- अंगदुखी आणि प्रकृती बिघडणे.

- खूप ताप येणे.

- खूप खोकला आल्यामुळे रुग्ण रडू लागतात. 

- खोकताना रक्त येतं.

संसर्गापासून कसे राहाल सुरक्षित

- कोणत्याही प्रकारच्या संसर्गापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी स्वच्छतेची काळजी घ्या. 

- डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करा. 

- वारंवार हात धुण्याची सवय लावा.

-  तुमच्या आहारात संतुलित आहार समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा.

Web Title: mystery virus outbreak in russia leaves sufferers coughing up blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.