इराणच्या दोन अण्वस्त्र संशोधकांचा रहस्यमय मृत्यू, या देशाने टार्गेट किलिंग केल्याचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 16:57 IST2022-06-14T16:56:47+5:302022-06-14T16:57:15+5:30
Iran Vs israel: इराणच्या दोन अणुशास्त्रज्ञांचा संशयास्पद परिस्थितीत रहस्यमयरीत्या मृत्यू झाला आहे. या दोन्ही शास्त्रज्ञांच्या मृत्यूसाठी इराण आपला शत्रू देश असलेल्या इस्राइलला दोषी ठरवल आहे.

इराणच्या दोन अण्वस्त्र संशोधकांचा रहस्यमय मृत्यू, या देशाने टार्गेट किलिंग केल्याचा संशय
तेहरान - इराणच्या दोन अणुशास्त्रज्ञांचा संशयास्पद परिस्थितीत रहस्यमयरीत्या मृत्यू झाला आहे. या दोन्ही शास्त्रज्ञांच्या मृत्यूसाठी इराण आपला शत्रू देश असलेल्या इस्राइलला दोषी ठरवल आहे. इस्राइलने विषप्रयोग करून आपल्या दोन शास्त्रज्ञांना ठार मारले, असा आरोप इराणकडून करण्यात येत आहे. इराण सातत्याने आपला अणुकार्यक्रम पुढे नेत आहे. मात्र इस्राइलचा त्याला विरोध आहे. याआधीही इराणच्या काही शास्त्रज्ञांचा रहस्यमय पद्धतीने मृत्यू झाला होता. या मृत्यूंसाठीही इराणकडून इस्त्राइलला जबाबदार धरण्यात आले होते.
द न्यूयॉर्क टाइम्सने एक इराणी अधिकारी आणि सरकारशी संबंधित दोन सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, इराणयचे शास्त्रज्ञ अयूब इंतजारी आणि कामरान अगमोलेई यांचा वेगवेगळ्या घटनांमध्ये मृत्यू झाला होता. संशयास्पद स्थितीत झालेले हे मृत्यू म्हणजे इस्राइलकडून करण्यात आलेली टार्गेट किलिंग असल्याचा आरोप होत आहे.
दोन्ही शास्त्रज्ञांचा मृत्यू कसा झाला. ते काय काम करत होते आणि सरकारसोबत त्यांचे काय संबंध होते. याबाबत संपूर्ण माहिती समोर आलेली नाही. दोन्ही शास्त्रत्र तरुण होते. तसेच मृत्यूवेळी एकदम स्वस्त होते. दोघांचाही मृत्यू वेगवेगळ्या घटनांमध्ये झाला आहे.
३५ वर्षींय एंतजारी यज्द शहरामध्ये एका डिनर पार्टीमध्ये सहभागी झाला होता. त्यानंतर तो आजारी पडला आणि ३१ मे रोजी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, ही पार्टी आयोजित करणारा बेपत्ता आहे. तसेच आता पोलीस त्याचा शोध घेत आहेत.