तब्बल 334 अणुबॉम्बच्या बरोबरीचा होता म्यानमारचा भूकंप! आता तज्ज्ञांनी दिलाय धडकी भरवणारा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 13:10 IST2025-03-30T13:09:11+5:302025-03-30T13:10:13+5:30

स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आपत्तीत आतापर्यंत १,६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर यूएसजीएसच्या मते, मृतांचा आकडा १०,००० हून अधिक असू शकतो.

Myanmar earthquake was equivalent to 334 nuclear bombs Now experts have given a frightening warning | तब्बल 334 अणुबॉम्बच्या बरोबरीचा होता म्यानमारचा भूकंप! आता तज्ज्ञांनी दिलाय धडकी भरवणारा इशारा

तब्बल 334 अणुबॉम्बच्या बरोबरीचा होता म्यानमारचा भूकंप! आता तज्ज्ञांनी दिलाय धडकी भरवणारा इशारा


म्यानमारला शुक्रवारी ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाचा तडाखा बसला. यात मॅनमारचे मोठे नुकसान झाले आहे. भूगर्भशास्त्रज्ञ जेस फिनिक्स यांच्या मते, या भूकंपातून तब्बल ३३४ अणुबॉम्बच्या स्फोटाएवढी ऊर्जा बाहेर पडली. याशिवाय, या भागात दीर्घकाळापर्यंत भूकंपाचे धक्के येऊ शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणानुसार (USGS), भूकंपाचे केंद्र म्यानमारमधील मंडाले शहरात होते. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आपत्तीत आतापर्यंत १,६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर यूएसजीएसच्या मते, मृतांचा आकडा १०,००० हून अधिक असू शकतो.

334 अणुबॉम्बच्या बरोबरीचा भूकंप -
फिनिक्सने सीएनएनला दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपातून तब्बल ३३४ अणुबॉम्बच्या स्फोटाएवढी ऊर्जा बाहेर पडली. एवढेच नाही तर, भारतीय टेक्टोनिक प्लेट युरेशियन प्लेटला सातत्याने धडकत असल्याने, या भागात दीर्घकाळापर्यंत भूकंपाचे धक्के जाणवू शकतात. असा इशाराही फिनिक्सने दिला आहे.

म्यानमारमध्ये सुरू असलेले गृहयुद्ध आणि दळणवळण सेवा ठप्प झाल्याने, या आपत्तीचा नेमका परिणाम जगाला समजणे अवघड झाले आहे. फीनिक्स म्हणाले, गृहयुद्ध आणि दळणवळणातील व्यत्यय यामुळेही मदत कार्यावर परिणाम होत आहे.

भारत आणि चीनने पाठवली मदत -
भारताने मॅनमारमध्ये मदत आणि बचावकार्यासाठी एक वैद्यकीय युनिट आणि बचाव पथक पाठवले आहे. भारताने ब्लँकेट, ताडपत्री, स्वच्छता किट, स्लीपिंग बॅग्ज, सौर दिवे, अन्न पॅकेट्स आणि स्वयंपाकघर संच यांसारख्या आवश्यक वस्तू देखील पाठवल्या आहेत. याशिवाय, चीनच्या युनान प्रांतातील ३७ सदस्यीय पथक म्यानमारची राजधानी यांगून येथे पोहोचले आहे. हे पथक जीवनरक्षक उपकरणे, भूकंप पूर्वसूचना प्रणाली आणि ड्रोन सारख्या सुविधांसह मदत आणि वैद्यकीय मदत पुरवत आहे.

Web Title: Myanmar earthquake was equivalent to 334 nuclear bombs Now experts have given a frightening warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.