‘माझ्या पराभवास भारत जबाबदार’
By Admin | Updated: March 13, 2015 23:23 IST2015-03-13T23:23:22+5:302015-03-13T23:23:22+5:30
श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील पराभवास भारत जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

‘माझ्या पराभवास भारत जबाबदार’
कोलंबो : श्रीलंकेचे माजी राष्ट्राध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील पराभवास भारत जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. तसेच निवडणुकीतील दारुण पराभवाचे खापर त्यांनी अमेरिका व युरोपीय देशांवरही फोडले आहे.
हाँगकाँग येथील साऊथ चायना मॉर्निंग पोस्टला दिलेल्या मुलाखतीत राजपक्षे म्हणाले, ‘अमेरिका, नॉर्वे, युरोप व रॉ (भारताची परदेशातील गुप्तचर संस्था) यांनी माझ्याविरोधात जाहीरपणे काम केले होते, हे उघड गुपित आहे. भारत व अमेरिका यांनी मला हरविण्यासाठी आपल्या दूतावासाचा उघडपणे वापर केला.’ राजपक्षे यांच्या पराभवानंतर राजपक्षेविरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्रित आणण्यात ‘रॉ’च्या अधिकाऱ्याची प्रमुख भूमिका होती असा दावा करण्यात आला होता. मात्र, भारताने हा दावा तात्काळ फेटाळला होता. (वृत्तसंस्था)