मुंबई दहशतवादी हल्ला: कटात सहभागी असलेल्या राणाचे प्रत्यार्पण; सर्व अडथळे दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 06:19 IST2025-01-26T06:17:56+5:302025-01-26T06:19:13+5:30
मुंबई हल्ल्यासंदर्भातील खटल्यात इलिनॉइस राज्यातील फेडरल न्यायालयाने मला निर्दोष ठरविले आहे, असे राणाने आपल्या याचिकेत म्हटले होते.

मुंबई दहशतवादी हल्ला: कटात सहभागी असलेल्या राणाचे प्रत्यार्पण; सर्व अडथळे दूर
वॉशिंग्टन : मुंबईवर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील कटात सहभागी असलेल्या तहव्वूर राणा याची पुनर्विचार याचिका फेटाळून त्याच्या प्रत्यार्पणाचा निर्णय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. त्यामुळे त्याला भारतात आणण्याच्या मार्गातील कायदेशीर अडथळे आता दूर झाले आहेत.
भारतात प्रत्यार्पण करू नये, याकरिता राणाने अमेरिकेच्या काही न्यायालयांमध्ये याआधी दाद मागितली होती. तो मूळ पाकिस्तानचा रहिवासी असून, त्याने कालांतराने कॅनडाचे नागरिकत्व स्वीकारले. मुंबई हल्ल्यासंदर्भातील खटल्यात इलिनॉइस राज्यातील फेडरल न्यायालयाने मला निर्दोष ठरविले आहे, असे राणाने आपल्या याचिकेत म्हटले होते. त्याला विरोध करताना प्रीलोगर यांनी न्यायालयाला सांगितले की, तहव्वूर राणाने इमिग्रेशन लॉ सेंटर उघडण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेत खोटी माहिती सादर केली होती.