२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंडला लपवतंय पाकिस्तान; झकीउर लखवीला ISI ने केले अंडरग्राऊंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2024 14:25 IST2024-12-05T14:23:44+5:302024-12-05T14:25:01+5:30
दहशतवादी झकीउर रहमान लख्वी याला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने भूमिगत केले आहे.

२६/११ मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंडला लपवतंय पाकिस्तान; झकीउर लखवीला ISI ने केले अंडरग्राऊंड
Zakiur Rehman Lakhvi : मुंबई २६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड झकीउर रहमान लख्वी याला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने भूमिगत केले आहे. गेल्या महिन्यात झकीउर रहमान लख्वीचा पाकिस्तानमध्ये फिरत असतानाचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर आता झकीउर रहमान लखवीला भूमिगत करण्यात आलं आहे. लखवी हा अबू वासीच्या नावाने पाकिस्तानात फिरत असल्याचे समोर आलं होतं.
पाकिस्तानच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्स मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असलेला लष्कर-ए-तोयबाचा कमांडर झकी-उर-रहमान लखवी याला भूमिगत होण्यास भाग पाडले आहे. त्याचा व्यायाम करताना व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक दाढी असलेला माणूस फिटनेस चॅलेंजमध्ये सहभागी असल्याचा दिसला. ही व्यक्ती जागतिक दहशतवादी असल्याचा अंदाज लावला जात होता. त्यानंतर तो झकीउर झकीउर रहमान लखवी असल्याचे म्हटलं जात आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, व्हिडीओमधील व्यक्ती खरोखर लख्वी होता. ज्याला २०२१ मध्ये पाकिस्तान कोर्टाने दहशतवादी कारवायांसाठी पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांमध्ये खळबळ उडाली असून त्यांनी लखवीला भूमिगत करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या अनेकांनी आपले सोशल मीडिया अकाउंट बंद केले आहेत. ३ मिनिटे ९ सेकंदांच्या या व्हिडिओमध्ये झकीउर रहमान लखवीपुश अप आणि डंबेल उचलताना दिसत होता.
झकीउर-रेहमान लखवी हा मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि हँडलर आहे. पाकिस्तानच्या तुरुंगात कोण असावे पण दहशतवाद्यांची मजा पाकिस्तानात नसेल तर जगात कुठे मजा येईल. त्यामुळे भारत पाकिस्तानमध्ये का खेळत नाही, याचे उत्तर हे चित्र आहे कारण ज्या लाहोरमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने होणार आहेत, तिथे हा दहशतवादी व्हीव्हीआयपीप्रमाणे आपली तब्येत सांभाळत आहे.