Afghanistan: तालिबानने गेम केला! मुल्ला बरादरचेच पंख छाटले; राष्ट्राध्यक्ष पदासाठी विश्वासू दहशतवादी निवडला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 12:13 PM2021-09-07T12:13:05+5:302021-09-07T12:38:12+5:30

Taliban Finalise its Leadership in Afghanistan Govt: राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेत मुल्‍ला बरादर शिवाय मुल्ला उमरचा मुलगा याकूब, सिराजुद्दीन हक्‍कानी सारखे प्रभावी तालिबानी दहशतवादी कमांडर होते. परंतू हसनने बाजी मारली.

Mullah Mohammad Hasan Akhund to be head of Taliban Afghanistan Govt; mullah baradar deputy | Afghanistan: तालिबानने गेम केला! मुल्ला बरादरचेच पंख छाटले; राष्ट्राध्यक्ष पदासाठी विश्वासू दहशतवादी निवडला

Afghanistan: तालिबानने गेम केला! मुल्ला बरादरचेच पंख छाटले; राष्ट्राध्यक्ष पदासाठी विश्वासू दहशतवादी निवडला

Next

काबूल : पंजशीरमध्ये घमासान युद्ध सुरु असताना तालिबानने इकडे सत्तास्थापनेच्या हालचाली वेगवान केल्या आहेत. अफगाणिस्तानचा राष्ट्राध्यक्ष कोण होणार? या प्रश्नावर 2020 मध्ये अमेरिकेशी थेट चर्चा करणारा मुल्ला बरादरचे (mullah baradar) नाव पुढे येत होते. मात्र, तालिबानने मुल्ला बरादरचेच पंख छाटले असून तालिबानचे (Taliban) संस्थापक दिवंगत मुल्‍ला उमरच्या जवळचा सहकारी मुल्ला मोहम्मद हसन अखुंदच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब केले आहे. मुल्ला बरादरला आता त्याच्या हाताखाली काम करावे लागणार आहे. (Who is Mullah Hassan Akhund? Taliban's likely to head new Afghanistan govt)

Afghanistan: तालिबान हादरला! पंजशीरमधील ५ तळांवर अज्ञात विमानांचा एअरस्ट्राईक

मुल्ला मोहम्मद हसन अखुंद (Mullah Mohammad Hasan Akhund) हा राष्ट्राध्यक्ष पदासाठी अर्ज करणार असल्याचे तालिबानच्या तीन प्रमुख नेत्यांनी स्पष्ट केले आहे. हसन हा तालिबानची सर्वात शक्तीशाली विंग रहबारी शूराचा प्रमुख आहे. जो गेल्या दीड महिन्यांत कुठेही प्रकाशझोतात आला नव्हता. हसन हा तालिबानचे जन्मस्थान कंदाहरचा आहे. दहशतवादी आंदोलनाच्या संस्थापकांपैकी एक आहे. त्याने रहबारी शूराचे 20 वर्षे नेतृत्व केले आहे. 

Panjshir Fall: पंजशीर पडले? तालिबान्यांनी गव्हर्नर ऑफिसवर झेंडा फडकवला; सालेह, अहमद मसूद सोडून गेले

मुल्ला हसन हा गेल्या 20 वर्षांपासून शेख हैबतुल्ला अखुंजादाचा खास माणूस आहे. याच वफादारीचे बक्षिस हसनला दिले जाणार आहे. हसनची साधी राहणी आणि मागच्या तालिबान सरकारमधील कामही निवडीसाठी उययुक्त ठरले आहे. 

राष्ट्राध्यक्ष पदासाठी कोण कोण होते स्पर्धेत...
राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेत मुल्‍ला बरादर शिवाय मुल्ला उमरचा मुलगा याकूब, सिराजुद्दीन हक्‍कानी सारखे प्रभावी तालिबानी दहशतवादी कमांडर होते. परंतू हसनने बाजी मारली. जर या तिघांपैकी कोणीही राष्ट्राध्यक्ष झाला असता तर हैबुल्‍ला अखुंजादाला आव्हान देण्याची शक्यता होती. याच कारणामुळे या तिघांचे पत्ते कट करून तालिबानने मुल्‍ला हसनची निवड करण्याची खेळी खेळली आहे. हसन हा संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादी यादीत आहे. तर बरादर हा अमेरिकेच्या जवळचा आहे. आता बरादरला हसनच्या हाताखाली उप राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करावे लागणार आहे.

Web Title: Mullah Mohammad Hasan Akhund to be head of Taliban Afghanistan Govt; mullah baradar deputy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.