Panjshir Fall: पंजशीर पडले? तालिबान्यांनी गव्हर्नर ऑफिसवर झेंडा फडकवला; सालेह, अहमद मसूद सोडून गेले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2021 11:32 AM2021-09-06T11:32:37+5:302021-09-06T11:35:15+5:30

Panjshir is in Taliban control? तालिबानने पंजशीर घाटीवर पूर्णपणे कब्जा केल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानचे कार्यकारी राष्ट्राध्यक्ष अमरुल्‍ला सालेह यांनी अज्ञात स्थळी आसरा घेतला आहे. पंजशीरचा सिंहचा मुलगा अहमद मसूद गेल्या तीन दिवसांपासून ताजिकिस्तानमध्ये गेला आहे.

Taliban claim full control on Panjshir valley; raise white flag at Governor House | Panjshir Fall: पंजशीर पडले? तालिबान्यांनी गव्हर्नर ऑफिसवर झेंडा फडकवला; सालेह, अहमद मसूद सोडून गेले

Panjshir Fall: पंजशीर पडले? तालिबान्यांनी गव्हर्नर ऑफिसवर झेंडा फडकवला; सालेह, अहमद मसूद सोडून गेले

googlenewsNext

काबूल : सोव्हिएत रशियाच्या फौजांनाही जिंकता न आलेला अफगाणिस्तानचा (Afghanistan) अजिंक्य असलेला भाग आज तालिबानला (Taliban) शरण गेला आहे. पंजशीरमध्ये (Panjshir) तालिबानने गव्हर्नर ऑफिससह अन्य कार्यालयांवर आपला पांढरा झेंडा फडकविला असून दावा खोटा ठरविणाऱ्या पंजशीरच्या लढवय्यांचा दावा खोडून काढला आहे. लढाई एकीकडे सुरु असली तरी पंजशीरच्या एका मोठ्या आणि महत्वाच्या भागावर तालिबानचे वर्चस्व प्रस्थापित झाल्याचे यावरून समोर येत आहे. (Taliban claim full control on Panjshir valley; raise white flag at Governor House.)

Afghanistan: पंजशीरच्या अहमद मसूदला तगडा झटका; तालिबानच्या हल्ल्यात फहीम दश्ती ठार

तालिबानने पंजशीर घाटीवर पूर्णपणे कब्जा केल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे अफगाणिस्तानचे कार्यकारी राष्ट्राध्यक्ष अमरुल्‍ला सालेह यांनी अज्ञात स्थळी आसरा घेतला आहे. पंजशीरचा सिंहचा मुलगा अहमद मसूद गेल्या तीन दिवसांपासून ताजिकिस्तानमध्ये गेला आहे. यामुळे पंजशीरमध्ये लढवय्यांना कोणीच वाली उरला नसल्याने त्यांचेही मानसिक खच्चीकरण होत आहे. 
रविवारपासून पाकिस्तानने हवाई हल्ले सुरु केले असून यामध्ये सालेह यांच्या घरावरही बॉम्बफेक करण्यात आली. अहमद मसूद यांनी म्हटले की, तालिबानी आमच्याविरोधात लढत नसून आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्याने हल्ला केला असल्याचा आरोप केला आहे. 

Afghanistan: पंजशीर युद्धात पाकिस्तानची थेट उडी; हवाई दलाकडून जोरदार बॉम्बफेक सुरु

तालिबानी दहशतवाद्यांनी गेल्या काही दिवसांपासून पंजशीरची शहरे घेरली होती. यानंतर त्यांनी रविवारी रात्री जोरदार हल्ला चढविला. जमिनीवरून आक्रमण होत असताना पंजशीरच्या रेझिस्टंस फ्रंटचे कंबरडे मोडण्यासाठी पाकिस्तानी हवाई दलाने ड्रोन आणि लढाऊ हेलिकॉप्टरद्वारे हल्ले चढविले. यामध्ये अहमद मसूद यांचा जवळचा नेता फहीम दश्‍ती आणि टॉपचा कमांडर जनरल साहिब अब्‍दुल वदूद झोर मारला गेला आहे. मसूद आणि सालेह यांनी पलायन केल्याने सोमवारी सकाळी तालिबानने पंजशीर जिंकल्याचा दावा केला आहे. 

सावधान! अफगाणिस्तानातील तालिबानच्या वाढत्या सामर्थ्यानं भारताला धोका; CIA च्या माजी अधिकाऱ्याचा दावा

पाकिस्तानवर गंभीर आरोप...
मसूद यांनी ट्विटरवरून पाकिस्तानवर गंभीर आरोप केले आहेत. आमच्यासोबत पाकिस्तान आणि आयएसआय युद्ध करतोय, तालिबान नाही. आमच्याशी लढण्याची तालिबानची तेवढी ताकद नाही. पाकिस्तान स्पेशल फोर्सचे कमांडो पॅराशूटद्वारे उतरवत आहे. अमेरिकेची हेलिकॉप्टर ताब्यात आल्याने तालिबान त्यातून गोळीबार करत आहे. 

Web Title: Taliban claim full control on Panjshir valley; raise white flag at Governor House

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.