OpenAI वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सुचिर बालाजी यांच्या मृत्यूचे गुपित आईने उघड केले, FBI'कडे चौकशीची मागणी; इलॉन मस्क यांनीही दिले समर्थन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 09:47 IST2024-12-30T09:45:47+5:302024-12-30T09:47:03+5:30
काही दिवसापूर्वी अमेरिकेत सुचिर बालाजी या तरुणाचा मृतदेह सापडला. या प्रकरणी आता त्याच्या आईने चौकशीची मागणी केली आहे.

OpenAI वर प्रश्न उपस्थित करणाऱ्या सुचिर बालाजी यांच्या मृत्यूचे गुपित आईने उघड केले, FBI'कडे चौकशीची मागणी; इलॉन मस्क यांनीही दिले समर्थन
काही दिवसापूर्वी अमेरिकेतली सॅन फ्रान्सिस्को येथे एका फ्लॅटमध्ये भारतीय अभियंता सुचिर बालाजी या तरुणाचा मृतदेह सापडला होता. सुचिर बालाजी यांनी OpenAI साठी काम केले आहे आणि कंपनीवर कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला होता. आता त्याच्या मृत्यूच्या एका महिन्यानंतर त्याच्या आईने एफबीआय चौकशीची मागणी केली आहे.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांचे निधन, कर्करोगाने होते ग्रस्त
OpenAI व्हिसलब्लोअर आणि संशोधक २६ नोव्हेंबर रोजी कॅलिफोर्नियातील त्याच्या सॅन फ्रान्सिस्को अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळले. अधिकाऱ्यांनी बालाजी यांचा मृत्यू आत्महत्या असल्याचे घोषित केले होते. रविवारी ट्विटरवर एका पोस्टमध्ये त्याची आई पूर्णिमा रामा राव यांनी सांगितले की, एका खासगी तपासनीसाची नियुक्ती केली आणि मृत्यूचे कारण शोधण्यासाठी शरीराची दुसऱ्यांदा चाचणी केली.
बालाजी यांच्या बुकानन स्ट्रीटवर असलेल्या अपार्टमेंटची तोडफोड केल्याचा आरोपही रामाराव यांनी केला आहे. "बाथरुममध्ये भांडण झाल्याच्या खुणा होत्या आणि रक्ताच्या डागांच्या आधारे, कोणीतरी त्याला बाथरूममध्ये मारल्यासारखे दिसते.
एफबीआय चौकशीची मागणी करत रामाराव म्हणाले, "ही एक क्रूर हत्या आहे, SF शहरातील वकिली आम्हाला न्याय मिळण्यापासून थांबवत नाहीत. खासगी शवविच्छेदनात पोलिसांनी सांगितलेल्या मृत्यूच्या कारणाची पुष्टी होत नाही, असेही ते म्हणाले.
उद्योगपती इलॉन मस्क यांचे आणि OpenAIचे सीईओ सॅम ऑल्टमन यांच्यात गेल्या काही दिवसापासून वाद सुरू आहेत. मस्क यांनीही या पोस्टवर कमेंट केली आहे. 'हे आत्महत्येसारखे वाटत नाही', असं त्यांनी म्हटले आहे. इल़न मस्क यांनीही या हत्येवर संशय व्यक्त केला आहे.