१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 19:38 IST2025-12-20T19:37:54+5:302025-12-20T19:38:47+5:30
Bangladesh Crisis Osman Hadi Death: हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशात अशांतता आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत.

१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
Bangladesh Crisis Osman Hadi Death: बांगलादेशाचे विद्यार्थी नेते शरीफ उस्मान हादी यांच्यावर सिंगापूरमध्ये गोळीबार करण्यात आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अथक उपचारानंतरही हादी यांना वाचवता आले नाही. १८ डिसेंबरला त्यांचे निधन झाले. हादी यांच्या मृत्यूमुळे बांगलादेशात गोंधळ उडाला. लोक रस्त्यावर उतरले आणि घोषणाबाजी केली. अनेक भागात आगही लावण्यात आली. संतप्त जमावाने देशातील माध्यमांच्या कार्यालयावरही हल्ले केले.
सामानाची तोडफोड, कॉम्प्युटर्स चोरले
हादी यांच्या मृत्यूनंतर बांगलादेशात अशांतता आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत, घोषणाबाजी करत आहेत आणि जाळपोळ करत आहेत. जमावाने मिडीया हाऊसेसवरही हल्ला केला. रात्री उशिरा जमावाने एकाच वेळी ढाका येथील द डेली स्टार आणि प्रोथम आलोच्या कार्यालयांवर हल्ला केला. मौल्यवान वस्तू लुटण्यात आल्या, इमारतीतील सामानाची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे पत्रकार अनेक तास आत अडकून राहिले. किमान १५० कॉम्प्युटर्स आणि इतर महत्त्वाची इलेक्ट्रॉनिक उपकरणे चोरीला गेली. तसेच कार्यालयातील कॅन्टीन आणि इतर गोष्टींचीही तोडफोड करण्यात आली.
ऑफिसमध्ये गोंधळ
आंदोलकांनी बातमीदारांवर अशांतता भडकवण्याचा आणि राजकीय हितसंबंध जोपासण्याचा आरोप केला. द डेली स्टार आणि प्रोथम आलो या दोन्ही माध्यमांनी हे आरोप जोरदारपणे नाकारले. हल्लेखोर मध्यरात्रीच्या सुमारास द डेली स्टारच्या काझी नजरुल इस्लाम अव्हेन्यू कार्यालयात जबरदस्तीने घुसले. त्यांनी फर्निचर आणि काचेचे दरवाजे फोडले, संगणक, कॅमेरे आणि हार्ड ड्राइव्ह फोडले, शहीद अबू सय्यद आणि मीर महफुजूर रहमान मुग्धो यांचे पोस्टर फाडले आणि अनेक मजल्यांवरील वस्तूंना आग लावली.
पत्रकार, कर्मचारी अडकून पडले
परिस्थिती इतकी भयानक झाली की ज्वाळा आणि दाट धुरामुळे पत्रकारांना छतावर जावे लागले. २८ पत्रकार आणि कर्मचाऱ्यांना अनेक तास तिथे आश्रय घ्यावा लागला. तपास पत्रकार झैमा इस्लाम यांनी फेसबुकवर लिहिले, "मला आता श्वास घेता येत नाही. खूप धूर आहे. मी आत अडकली आहे. तुम्ही मला मारत आहात." अग्निशमन दल, पोलिस आणि लष्कराच्या जवानांनी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अडकलेल्या पत्रकारांना वाचवले.