शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: दिलासादायक! कोरोनाबद्दलची 'ही' आकडेवारी वाचून तुम्हालाही बरं वाटेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2020 10:25 IST

Coronavirus कोरोनाबाधितांचा आकडा १६ लाखांच्या घरात; मृतांची संख्या ९५ हजार पार

वॉशिंग्टन: कोरोना विषाणूनं जगभरात थैमान घातलं असताना, कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत असताना काही सकारात्मक घडामोडीदेखील घडत आहेत. एका बाजूला अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून शेकडो जणांचे बळी जात असताना दुसरीकडे जगभरात आतापर्यंत साडे तीन लाखांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत. मृतांच्या तुलनेत बऱ्या झालेल्यांची संख्या जवळपास चौपट आहे. जॉन हॉपकिन्स विद्यापीठानं दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्याच्या घडीला जगातील कोरोनाबाधितांची संख्या १६ लाखांपेक्षा जास्त आहे. कोरोनामुळे ९५ हजार ७३५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ३ लाख ५६ हजार ६६० इतका आहे. कोरोनाबाधितांपैकी जवळपास २२ टक्के बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र प्रत्यक्षात हा आकडा यापेक्षा खूप जास्त असण्याची दाट शक्यता आहे. बहुतांश देशांमध्ये कोरोनाची अतिशय गंभीर असलेल्या रुग्णांनाच रुग्णालयांमध्ये दाखल केलं जातं. त्यामुळे बऱ्या झालेल्या रुग्णांमध्ये त्यांचीच गणना केली जाते.जवळपास ८० टक्के कोरोना रुग्णांमध्ये सौम्य लक्षणं आढळून येतात. बऱ्याचशा देशात अशा रुग्णांवर घरीच उपचार केले जातात. त्यांच्या प्रकृतीत लगेच सुधारणादेखील होते. मात्र रुग्णांचा आकडा मोजताना केवळ रुग्णालयात दाखल असलेल्यांचा विचार केला जातो. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सर्वाधिक रुग्ण बरे झालेल्या रुग्णांची आकडेवारी लक्षात घेतल्यास यामध्ये चीन आघाडीवर आहे. चीनमध्ये ७७ हजार ६७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले. यानंतर जर्मनी (५२,४०७), स्पेन (५२,१६५), इराण (३२,३०९) यांचा क्रमांक लागतो. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या