पाकिस्तानकडून सीमेवर तब्बल 300 रणगाडे तैनात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 14:28 IST2019-05-14T14:27:27+5:302019-05-14T14:28:17+5:30
14 फेब्रुवारीला पुलवमामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.

पाकिस्तानकडून सीमेवर तब्बल 300 रणगाडे तैनात
भारतीय हवाई दलाने चढवलेल्या बालाकोट हवाई हल्ल्याला दोन महिने उलटून गेले आहेत. मात्र, पाकिस्तान आजही सावध असून एकीकडे तणाव कमी करण्याचे सोंग रचत महत्वाचा भाग असलेल्या शकरगडमध्ये तब्बल 300 रणगाडे तैनात केलेले आहेत.
14 फेब्रुवारीला पुलवमामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. यानंतर भारत पलटवार करणार या भीतीने पाकिस्तानने सीमेवर विशेष सैन्य तैनात केले होते. नुकतेच तणाव कमी करण्यासाठी हे दल मागे घेतले असले तरीही पाकिस्तानने सीमेवर अद्याप तीन ब्रिगेड ठेवलेली आहेत. यामध्ये बख्तरबंद ब्रिगेड, 125 बख्तरबंद ब्रिगेड आणि 8-15 डिव्हिजन तैनात केलेल्या आहेत.
टाइम्स नाऊमधील रिपोर्टअनुसार पाकिस्तानच्या सीमेवरील सैन्याला एक स्वतंत्र बख्तरबंद ब्रिगेड साथ देत आहे. या अहवालामध्ये सरकारी सुत्रांचा हवाला देण्यात आला आहे. हे सैन्य आक्रमक हल्ल्यांसाठी तयार करण्यात आलेले आहे. पुलवामा हल्ल्यानंतर या सैन्याची तैनाती करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये जम्मू-श्रीनगर राज्यमार्गावरून जाणाऱ्या सीआरपीएफच्या ताफ्यावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला होता. पाकिस्तानने आक्रमक दल 1 आणि दोन या पथकांना माघारी बोलावले नव्हते. यामुळे शकरगडमध्येही तैनात केलेले रणगाडे चिंतेचा विषय बनले आहेत.