शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

अमेरिकेत मोदींचे जोरदार स्वागत; पंतप्रधान म्हणाले, जगातील भारतीय समाज हीच आमची शक्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 1:39 PM

विदेशांत गेल्यावर मोदी हे तेथील भारतीयांशी मोठ्या समारंभात संवाद साधतात. या भेटीत मात्र कोविड-१९ परिस्थितीमुळे तसा संवाद साधला जाणार नाही.

वॉशिंग्टन : वेगवेगळ्या कारणांनी जगात वास्तव्य करणाऱ्या भारतीयांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली. मोदी यांचे अमेरिकेच्या भेटीवर बुधवारी सायंकाळी येथे आगमन झाल्यावर भारतीय-अमेरिकनांच्या गटांनी त्यांचे विमानतळावर खूप उत्साहात स्वागत केले. नंतर मोदी यांनी हॉटेलमध्ये भारतीय सदस्यांशी संवाद साधला. “वॉशिंग्टन डीसीमध्ये माझे उत्साहात स्वागत झाल्याबद्दल मी भारतीय समुदायाचा ऋणी आहे. हा समाज हीच आमची शक्ती आहे,” असे मोदी यांनी ट्विटरवर म्हटले. भारतीय-अमेरिकन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेची छायाचित्रेही त्यांनी ट्विटरवर टाकली. “संपूर्ण जगात भारतीय स्थलांतरितांनी आपले वैशिष्ट्य निर्माण केले आहे,” असे मोदी म्हणाले.  विदेशांत गेल्यावर मोदी हे तेथील भारतीयांशी मोठ्या समारंभात संवाद साधतात. या भेटीत मात्र कोविड-१९ परिस्थितीमुळे तसा संवाद साधला जाणार नाही. मोदी हे भारतीय-अमेरिकनांमध्ये खूप लोकप्रिय असून, अमेरिकेच्या लोकसंख्येत हे प्रमाण १.२ टक्के आहे.  अमेरिकेच्या राजकारणासह अनेक क्षेत्रांत भारतीय हे महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. माझा हा अमेरिकेचा दौरा उभय देशांत कॉम्प्रेहेन्सिव्ह ग्लोबल स्ट्रटेजिक पार्टनरशिप बळकट करणे आणि जपान व ऑस्ट्रेलियाशी संबंध घट्ट करण्याची संधी आहे, असे मोदी म्हणाले.

हॅरिस यांच्यासोबत होणार चर्चाअमेरिकेच्या उप-राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस  आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ही पहिलीच भेट असेल. ‘द लॉस एंजेलिस टाइम्स’ने मोदी-हॅरिस भेट अमेरिकेतील भारतीय समुदायासाठी महत्त्वाचा क्षण असेल, असे म्हटले आहे. हॅरिस यांनी ३ जून रोजी पंतप्रधान मोदी यांच्याशी फोनवरून चर्चा केली होती. मोदी आणि हॅरिस यांची प्रत्यक्ष होणारी पहिली भेट असेल.

सुरक्षा भागिदारीत भारताचा समावेश नाही-     ऑस्ट्रेलिया आणि इंग्लड यांच्याशी नुकत्याच करण्यात आलेल्या सुरक्षा भागीदारीत भारत किंवा जपानला समाविष्ट करून घेण्याची शक्यता अमेरिकेने फेटाळून लावली आहे.

- १५ सप्टेंबर रोजी अध्यक्ष जो बायडेन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी त्रिपक्षीय सुरक्षा आघाडीची (एयूकेयूएस) घोषणा केली. यामुळे ऑस्ट्रेलियाला अण्वस्रधारी पाणबुडीची तुकडी मिळणार आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिकाUSअमेरिका