मोदी व शी जिनपिंग यांची दुसरी भेट फलदायी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2018 03:56 IST2018-06-10T03:56:44+5:302018-06-10T03:56:44+5:30
चीनच्या पूर्वेकडील शातोंग प्रांताची राजधानी व प्रमुख बंदर असलेल्या चिंगदाओ शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात शनिवारी झालेल्या बैठकीत द्विपक्षीय संबंध व व्यापार तसेच गुंतवणूक क्षेत्रात सहकार्य अधिक बळकट करण्यावर चर्चा झाली.

मोदी व शी जिनपिंग यांची दुसरी भेट फलदायी
चिंगदाओ (चीन) : चीनच्या पूर्वेकडील शातोंग प्रांताची राजधानी व प्रमुख बंदर असलेल्या चिंगदाओ शहरात पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात शनिवारी झालेल्या बैठकीत द्विपक्षीय संबंध व व्यापार तसेच गुंतवणूक क्षेत्रात सहकार्य अधिक
बळकट करण्यावर चर्चा झाली.
मोदी व शी जिनपिंग यांच्यात दोन करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. यापैकी एक ब्रह्मपुत्रा नदीच्या जलप्रवाहासंबंधीची सर्व शास्त्रीय माहिती चीनने भारतास देण्याचा आहे. दुसºया कराराने भारतातून बासमती तांदळाची चीनमध्ये निर्यात करण्याचे ठरले.
सदस्य देशांच्या प्रतिनिधीमंडळ बैठकीला मोदी उपस्थित राहिले. उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शवकत मिर्झियोयेव यांचीही पंतप्रधानांनी भेट घेतली. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन व मोदी यांचीही शनिवारी उशिरा भेट अपेक्षित होती.
भारत, पाकिस्तान, चीन, कझागस्तान, रशिया, ताजिकिस्तान, किरगिझीस्तान व उझबेकिस्तान हे देश ‘एससीओ’चे सदस्य आहेत. भारत व पाकिस्तानला गेल्या वर्षीच त्यात सामील केले. पूर्ण सदस्य म्हणून दोघांना ही परिषद महत्त्वाची आहे.