इराण मोहीम फत्ते करू; ट्रम्प यांचे अमेरिकावासीयांना उद्देशून भाषण, तेलाच्या किमती ४ टक्क्यांनी वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 06:51 IST2026-04-03T06:47:10+5:302026-04-03T06:51:02+5:30

२-३ आठवड्यांत ड्राणवर कठोर हल्ल्याचा इशारा; अमेरिकेच्या युद्ध निर्णयाचे केले समर्थन,

Mission Iran Will Be Accomplished Trump Warns of Major Strikes Within 2 3 Weeks | इराण मोहीम फत्ते करू; ट्रम्प यांचे अमेरिकावासीयांना उद्देशून भाषण, तेलाच्या किमती ४ टक्क्यांनी वाढल्या

इराण मोहीम फत्ते करू; ट्रम्प यांचे अमेरिकावासीयांना उद्देशून भाषण, तेलाच्या किमती ४ टक्क्यांनी वाढल्या

वॉशिंग्टन: इराणविरोधात सुरू असलेली अमेरिकेच्या लष्कराची मोहिमेतील मुख्य धोरणात्मक उद्दिष्टे जवळपास पूर्ण झाली असून, ही मोहीम लवकरच फत्ते होईल, असे प्रतिपादन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केले.

सुमारे एक महिन्याहून अधिक काळ सुरू असलेल्या अमेरिकेच्या या कारवाईचे ट्रम्प यांनी समर्थन केले. शिवाय येत्या दोन तीन आठवड्यांत इराणवर अधिक कठोर हल्ले केले जातील आणि त्यांना पूर्णपणे माघार घ्यावी लागेल, असाही ट्रम्प यांनी दावा केला. 

सुमारे २० २० मिनिटांच्या या भाषणात ट्रम्प यांनी अलीकडील आठवड्यांतील अनेक मुद्दे पुन्हा मांडले, परंतु नवे तपशील फारसे दिले नाहीत. ट्रम्प यांच्या भाषणानंतर जागतिक शेअर बाजारांवर तत्काळ परिणाम दिसून आला. तसेच कच्च्या तेलाच्या किमती ४% पेक्षा जास्त वाढल्या, तर आशियातील शेअर बाजार घसरले. दरम्यान, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी या युद्धामुळे अमेरिकेच्या जनतेचे कोणते हित साध्य होत आहे, असा सवाल अमेरिकेच्या जनतेला उद्देशून केला.

ट्रम्प यांच्या भाषणातील मुद्दे 


इराणच्या अणुस्थळांवरील हल्ल्यांनी ही केंद्रे दीर्घकाळ सुरू होणार नाहीत. 

अमेरिकेचे सैनिक इराणच्या भूमीवर पाठवण्याबाबत, नेटोबद्दलही मौन तेलावर अवलंबून असलेल्या देशांनी हॉर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन. 

हे युद्ध फक्त काही आठवड्यांचेच आहे, असे सांगून जनतेला वेळ देण्याचे संकेत दिले. अमेरिकेतील वाढती नाराजी, युद्धाबाबतचा लोकमताचा प्रभाव जाणवत असल्याचे त्यांनी संकेत दिले.

'केवळ ४ आठवड्यांत विजय मिळवला'

ट्रम्प यांनी इराणविरुद्धच्या युद्धाचे समर्थन करताना म्हटले की, इराणमधील सध्याचे युद्ध केवळ ३२ दिवसांपासून सुरू आहे. पहिले महायुद्ध एक वर्ष, ७ महिने आणि ५ दिवस चालले, तर दुसरे महायुद्ध ३ वर्षे, ८ महिने आणि २५ दिवस चालले. पण या युद्धात ४ आठवड्यांत अमेरिकेच्या सैन्याने रणांगणावर जलद आणि प्रचंड विजय मिळवले.

'युद्धाबाबत जनतेच्या संयमाची खात्री नाही' 

अमेरिकेच्या जनतेमध्ये इराणसोबत चालू असलेले युद्ध पुढे चालू ठेवण्याचा संयम आहे की नाही, याबाबत मला खात्री नाही, असे वक्तव्य ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये ईस्टरनिमित्त आयोजित खासगी कार्यक्रमात बुधवारी केले. ते म्हणाले, अमेरिका अतिशय सहजपणे इराणचे तेल ताब्यात घेऊ शकते, पण त्यासाठी अमेरिकेच्या जनतेमध्ये पुरेसा संयम दिसत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. लोकांना हे युद्ध संपलेले पाहायचे आहे, असे ते म्हणाले.

अॅमेझॉन सेंटरवर हल्ला 

इराणच्या लष्कराने बहरिनमधील अॅमेझॉनच्या क्लाऊड कम्प्युटिंग केंद्रावर हल्ला केल्याचा दावा केला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आल्याचे इराणने म्हटले आहे. हा हल्ला शत्रूसाठी पहिला प्रत्यक्ष इशारा आहे. आमच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले आणि हल्ले सुरूच ठेवले, तर आम्ही आधी जाहीर केलेल्या इतर कंपन्यांवर आणखी कठोर कारवाई करू, या प्रदेशातील कंपन्यांच्या संपूर्ण विनाशाची जबाबदारी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर असेल, अशी इराणने धमकी दिली आहे.

Web Title : ईरान मिशन जल्द सफल: ट्रम्प के भाषण से तेल की कीमतों में उछाल

Web Summary : राष्ट्रपति ट्रम्प ने ईरान मिशन के लगभग पूरा होने की घोषणा की और आगे की कार्रवाई का संकेत दिया। उनके भाषण के बाद तेल की कीमतों में 4% की वृद्धि हुई। ईरान ने अमेज़ॅन के बहरीन केंद्र को निशाना बनाते हुए हमलों को बढ़ाने की चेतावनी दी।

Web Title : Iran Mission Success Soon: Trump's Address Causes Oil Price Surge

Web Summary : President Trump announced near completion of the Iran mission, hinting at further action. Oil prices jumped 4% following his address. Iran warned of escalating attacks, citing Amazon's Bahrain center as a target.